Devendra Fadnavis : पर्यावरणापेक्षा राजकीय हेतूनं मेट्रोला विरोध, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Metro 3 Trial Run : मेट्रोला पर्यावरणापेक्षा राजकीय हेतूनं विरोध झाला असं, म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : आज मेट्रो 3 च्या (Metro 3 Trial) चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Elnath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मेट्रो 3 च्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. पर्यावरणापेक्षा राजकीय हेतूनं मेट्रोला विरोध झाला, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. मुंबईकरांच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. मेट्रो 3 ही मुंबईची नवीन लाईफलाईन असणार आहे, असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मेट्रो लाईन 3 ही कुलाबा - वांद्रे - सिप्झ अशी असणार आहे. सारीपूतनगर येथील ट्रॅकवर या चाचणीला सुरुवात झाली आहे.
'पर्यावरणापेक्षा राजकीय हेतूनं मेट्रोला विरोध'
मेट्रोचा वाद निर्माण झाल्यामुळे मेट्रो सुरु होण्याला विलंब होणार आहे. पर्यावरणापेक्षा राजकीय हेतूनं मेट्रोला विरोध करण्यात आला त्यामुळे मेट्रोचं काम पूर्ण होण्यास उशीर होईल. मात्र, नव्या सरकारने मुंबईकरांच्या हितासाठी चांगला निर्णय घेतल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो महत्त्वाची आहे, पर्यावरणला सपोर्ट करणारी ही मुंबई मेट्रो 3 आहे, विरोधकांनी यामध्ये केवळ राजकारण केलं, असंही त्यांनी म्हटलं आहे. जरी काजूरमार्गला कारशेडला नेला असता तरी स्टेबलिंग लाइन, रॅम्प तयार करावा लागला असता त्यामुळे आरेची जागा मोकळी राहिली असती असं नाही त्यामुळे आरेचा निर्णय हिताचाच आहे.
'राजकीय वादामुळे मेट्रो सुरु व्हायला विलंब'
आधीच्या सरकारने समिती नेमली होती, त्याचा अहवाल येईपर्यंत कॉस्ट सुद्धा वाढली आहे. मात्र आता मुंबई मेट्रो धावण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. मुंबईकरांच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला
आहे. पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत मेट्रोचा एक टप्पा सुरु होईल. त्यानंतर लगेच मेट्रो पूर्ण क्षमतेनं सुरु होईल. 20 हजार कोंटींचा हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल. अश्विनी भिडे आणि टीमनं यासाठी अहोरात्र मेहनत केली आहे, त्याबद्दल संपूर्ण टीमचा अभिनंदन, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
या चाचणीत काय पाहिलं जाणार ?
मेट्रो 3 च्य ट्रायल रनला सुरुवात झाली आहे. ही ट्रोन प्रवासी वाहतुकीसाठी सक्षम आहे का याचा विचार होणार. त्याशिवाय, मध्यम आणि हाय वोल्टेजवर ट्रेनची चाचणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय, ब्रेकची क्षमता, एअर कम्प्रेसर, स्वयंचलित दरवाज्यांची कार्यक्षमता, वायुविजन याचीही चाचणी होणार आहे. मेट्रो-3 ची चाचणी ही भूमिगत चाचणी होणार आहे. मेट्रो-3 चा मार्ग भूमिगत असणार आहे.