एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उच्चाधिकार मंत्रिगट आणि सुकाणू समितीची आज बैठक
मुंबई : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या उच्चाधिकार मंत्रिगट आणि शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीची बैठक दुपारी 1 वाजता होणार आहे.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे.
उच्चाधिकार मंत्रिगटात राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित असतील, तर शेतकऱ्यांच्या बाजूने सुकाणू समितीचे सदस्य, पुणतांब्यातील शेतकरी आणि शेतकरी नेते उपस्थित राहतील.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी 1 जूनपासून संपाचं हत्यार उपसलं होतं. यात पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी संप मागे घेतल्याचं जाहीर केल्यावरही नाशिकसह राज्याच्या काही भागात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवलं होतं. शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्य़ंत पोहोचवण्यासाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली. तसंच सरकारकडून उच्चाधिकार मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली.
सुकाणू समितीत फूट?
मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनाला योग्य दिशा देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीतच उभी फूट पडल्याचं चित्र आहे. मुंबईत सुकाणू समितीची काल शनिवारी अंतर्गत बैठक झाली, ज्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. मात्र, या बैठकीला उपस्थित राहण्यास काही सदस्यांनी नकार दिला आहे.
मोठ्या मतभेदानंतर शनिवारी संध्याकाळी 4 वाजता सुकाणू समितीच्या बैठकीला काल शनिवारी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात सुरुवात झाली. या बैठकीला प्रहार संघटनेने सर्वेसर्वा आणि सुकाणू समितीचे सदस्य बच्चू कडू हे अनुपस्थित होते. तर बैठकीकडे डॉ. गिरधर पाटील, अनिल घनवट, रामचंद्रबापू पाटील आणि डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी पाठ फिरवली होती.
या बैठकीवर सुकाणू समितीचे सदस्य डॉ. गिरधर पाटील यांनी टीकेची झोड उठवली आहे. बैठकीचं निमंत्रण सर्वांना देण्यात आलं. पण आपल्याला याची माहितीही दिली गेली नाही असं डॉ. पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.
सुकाणू समितीत कोण कोण आहे?
- राजू शेट्टी
- अजित नवले
- रघुनाथदादा पाटील
- संतोष वाडेकर
- संजय पाटील
- बच्चू कडू, प्रहार
- विजय जवंधिया
- राजू देसले
- गणेश काका जगताप
- चंद्रकांत बनकर
- एकनाथ बनकर
- शिवाजी नाना नानखिले
- डॉ.बुधाजीराव मुळीक
- डॉ. गिरीधर पाटील
- गणेश कदम
- करण गायकर
- हंसराज वडघुले
- अनिल धनवट
- कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर
- सहकारमंत्री सुभाष देशमुख
- अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
- परिवहन मंत्री दिवाकर रावते
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement