एक्स्प्लोर

अजित पवार, वळसे पाटील, भुजबळांमधील बैठक संपली; तब्बल चार तास चर्चा

23 नोव्हेंबरला सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुरुवातीला सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याची चर्चा होती. परंतु शरद पवार यांनी ट्वीट करुन हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय असून त्याचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं.

मुंबई : बंडखोरी केलेल्या अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा मनधरणी केली. विधानभवनात रामराजे निंबाळकर यांच्या चेंबरमध्ये तब्बल चार तास छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांची अजित पवारांशी चर्चा केली. त्यानंतर हे चारही नेते विधानभवानाबाहेर पडले. खासदार सुनील तटकरे यांनीही सकाळी अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न केले. जवळपास तासभर तटकरे अजित पवारांसोबत होते. मात्र बाहेर आल्यानंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर विधानसभानातील बैठकीनंतर अजित पवार घरी परतले. दरम्यान, अजित पवारांच्या समजावण्याचा प्रयत्न सुरु आहे, सकारात्मक मार्ग निघण्याची अपेक्षा असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. तसंच अजित पवार आणि शरद पवार यांचं बोलणं झालं नसल्याचंही ते म्हणाले. 23 नोव्हेंबरला सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुरुवातीला सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याची चर्चा होती. परंतु शरद पवार यांनी ट्वीट करुन हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय असून त्याचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं. यानंतर अजित पवारांनी बंड करुन भाजपला पाठिंबा दिल्याचं समोर आलं. अजित पवारांची मनधरणी करण्यात अपयश अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हापासून राष्ट्रवादीकडून त्यांचं बंड शमवण्याचे प्रयत्न सुरु आहे. मात्र अद्याप राष्ट्रवादीला यश आलेलं नाही. सुरुवातील दिलीप वळसे पाटील अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. परंतु दीड तासांच्या चर्चेनंतर काहीही हाती लागलं नाही. जयंत पाटील, सुनील तटकरे, रोहित पवार यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस, ट्विटर आणि फेसबुक पोस्टद्वारे भावनिक साद घालत अजित पवार यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही यश आलं नाही. आजही विधानभवनात राष्ट्रवादीचे नेत्यांनी अजित पवारांशी चर्चा करुन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांच्या बंडामागे माझा हात नाही : शरद पवार अजित पवार यांच्या बंडामागे माझा हात नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. साताऱ्यातील कराडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपने सत्तेचा गैरवापर करुन हवे ते निर्णय घेतल्याचा आरोप पवारांनी केला. तसंच राष्ट्रवादीचा भाजप सरकारला पाठिंबा नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. याशिवाय राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकासआघाडीचं सरकारच येईल, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला. संबंधित बातम्या -  

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime News: बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget