Raju Shetti, Mahadev Jankar : 'स्वाभिमानी'चे राजू शेट्टी आणि रासपच्या महादेव जानकरांची भेट; दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली?
एकीकडे राजू शेट्टी महाविकास आघाडीत सहभागी न होता बाहेरून पाठिंबाच्या अपेक्षा करत आहेत, तर दुसरीकडे महादेव जानकर यांनी माढा आणि परभणी हे दोन लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये मागितले आहेत.
![Raju Shetti, Mahadev Jankar : 'स्वाभिमानी'चे राजू शेट्टी आणि रासपच्या महादेव जानकरांची भेट; दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली? Meet Raju Shetti of Swabhimani and Mahadev Jankar of Rasap know the what exactly was discussed between the two Raju Shetti, Mahadev Jankar : 'स्वाभिमानी'चे राजू शेट्टी आणि रासपच्या महादेव जानकरांची भेट; दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/17/831f9353afd5ef87ddb9b57ae6e0f37e1710666666748736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Raju Shetti, Mahadev Jankar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष राजू शेट्टी आणि रासप नेते महादेव जानकर यांच्यात भेट झाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय विषयांवर चर्चा झाली असून महाविकास आघाडीच्या प्रस्तावावर सुद्धा दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. राजू शेट्टी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असून त्यांना महाविकास आघाडीने बाहेरून पाठिंबा द्यावा, अशा प्रकारचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंसमोर ठेवला आहे.
महाविकास आघाडीने माढा लोकसभा मतदारसंघ हा महादेव जानकर यांनी लढावा असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जानकरांना देण्यात आला आहे. एकीकडे राजू शेट्टी महाविकास आघाडीत सहभागी न होता बाहेरून पाठिंबाच्या अपेक्षा करत आहेत, तर दुसरीकडे महादेव जानकर यांनी माढा आणि परभणी हे दोन लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये मागितले आहेत. महाविकास आघाडी संदर्भात दोन्ही पक्षाचे नेते सकारात्मक असून प्रस्तावावर विचार करून निर्णय घेण्यात येणार आहे, असल्याची माहिती आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)