एक्स्प्लोर
शहीद पांडुरंग गावडे अनंतात विलीन
सिंधुदुर्ग: कुपवाड्यात अतिरेक्यांशी दोन हात करताना शहीद झालेले जवान पांडुरंग गावडे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. आंबोलीतल्या मुळवंदवाडी या त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुपवाड्यात शनिवारी एका घरात ५ दहशतवादी लपून बसले होते..त्या पाचही दहशतवाद्यांचा गावडे आणि त्यांच्या सहकार्यांनी खात्मा केला. मात्र त्यादरम्यान पांडुरंग गावडे जबर जखमी झाले होते. उपचारादरमयान त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि संपूर्ण आंबोलीचं वातावरण शोकमग्न झालं होतं. आज त्याच जड अंतकरणानं अवघ्या पंचक्रोशीनं त्यांना शेवटचा निरोप दिला.
गेल्या 15 वर्षांपासून पांडुरंग गावडे देशाची सुरक्षा करत होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.
अंत्ययात्रेदरम्यान शहीद पांडुरंग गावडेंच्या परिवाराला योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करु असं आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिलं.
संबंधित बातम्या
कुपवाड्यातील चकमकीत महाराष्ट्राचा वीर शहीद, पांडुरंग गावडे यांना वीरमरण
जम्मू-काश्मीरच्या कूपवाड्यात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement