एक्स्प्लोर
बीड, नाशिकमध्ये झेंडूची मातीमोल भावाने विक्री
बीड/नाशिक : नाशिक आणि बीडमध्ये ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचं दिवाळं निघालं आहे. झेंडूची फुलं एक रुपये प्रति किलो भावाने विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च निघणं देखील अशक्य झालं आहे.
बीडच्या रस्त्यांवर मातीमोल झालेले झेंडूचे फुलं म्हणजे हे शेतकऱ्याचं सोनं आहे. पण अवघा एक रुपया एक किलो दर मिळाल्याने शेतकऱ्याला हे सोनं अक्षरशः रस्त्यावर फेकून द्यावं लागलं.
नाशिकच्या बाजाराचीही काही वेगळी स्थिती नव्हती. कधीकाळी किमान 50 रुपये किलोने मिळणारा झेंडू कवडीमोल झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
यंदा टोमॅटो पडला, अतिपावसाने कांदाही सडला. त्यामुळे शेतकऱ्याने आशेने झेंडू लावला. पण अतिरिक्त उत्पादनाने त्याचा दरही रसातळाला गेला आहे.
जीवापाड जपलेल्या झेंडूला हंगामातच दर मिळाला नाही. एकाचवेळी झालेली लागवड आणि एकाचवेळी आलेलं भरघोस उत्पादन शेतकऱ्याच्या जीवावर उठलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता स्मार्ट शेतीकडे वळण्याची गरज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement