एक्स्प्लोर

Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचा कहर! नदी नाल्यांना पूर, शेती पिकांचं मोठं नुकसान, अनेकांच्या घरात शिरलं पाणी

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, मराठवाड्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे.

Marathwada Rain : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, मराठवाड्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरसह लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस 

छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये आज जोरदार पावसाने हजेरी लावली. संभाजीनगर तालुक्यातील मुरुमखेडा बनगाव ,कुबेर गेवराई. लाहुकी यासह अन्य भागात नदी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. अचानक आलेल्या पावसाला लोकांची धांदल उडाली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. नदी ओढे ओसंडून वाहत आहेत. 

शेती पिकांचं मोठं नुकसान 

छत्रपती संभजीनगर तालुक्यातील दूपारी तीन वाजण्याच्या दरम्यान  ढगफुटी सदृश्य पावसामुळे  कूबेर गेवराई, बनगाव, जयपुर, वरझडी, परीसरात  लाहूकी नदीला मोठा पूर आला आहे.  या पूराचे पाणी कूबेर गेवराई, बनगाव येथील अनेक घरात शिरल्याने नूकसान झाले आहे. या झालेल्या जोरदार पावसामुळे  काही ठिकाणी शेती खरडून गेल्यानं पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. तावरजा, तेरणा आणि मांजरा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. त्यामुळं नदीकाठच्यागावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. लातूर जिल्ह्यात रात्रीपासून कोसळत मुसळधार पाऊस कोसळत आहे.  तावरजा, तेरणा आणि मांजरा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचा जोर वाढल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भुसनी डॅमची दरवाजे वेळेवर न उघडल्याने तावरजा नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. औसा तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्प 73 टक्के भरला असून माकणी येथील निम्न तेरणा धरण 85 टक्के क्षमतेपर्यंत भरले आहे. पाणलोट क्षेत्रात आणखी पावसाची शक्यता असल्याने दोन्ही प्रकल्पांतून पाणी सोडण्याची तयारी सुरू आहे.

शहाजानी–वांजरखेडा रस्ता पाण्याखाली, वाहतूक ठप्प 

दरम्यान, लातूर जिल्हा सीमा भागातील औराद शहाजानी परिसरात काल रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा आणि तेरणा नदीच्या संगमस्थळी पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. औराद शहाजानी–वांजरखेडा रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधणे, नदी–नाले व पुलांपासून दूर राहणे, मुलांना पाण्याजवळ न पाठवणे आणि पूरप्रवण भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

सावधान! पुढील तीन दिवस महत्वाचे, 'या' भागात पडणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Embed widget