मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ, 11 जणांनी गमावला जीव, 4 लाखाहून अधिक शेतकरी बाधित
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात या पावसामुळं (Marathwada Rain) नुकसान झालं आहे. तसेच आतापर्यंत 11 लोकांचा जीव गेला आहे. तसेच शेती पिकांच देखील मोठं नुकसान झालं आहे.
Marathwada Rain : राज्यात सध्या मुसळधार पावसानं (Heavy Rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत, तर काही ठिकाणी नद्यांना पूर देखील आले आहे. विशेषत: मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात या पावसामुळं (Marathwada Rain) नुकसान झालं आहे. तसेच आतापर्यंत 11 लोकांचा जीव गेला आहे. तसेच शेती पिकांच देखील मोठं नुकसान झालं आहे. जाणून घेऊयात मराठवाड्याला या पावसाचा किती फटरका बसला याबाबतची सविस्तर माहिती
1 हजार 154 गावांना या पावसाचा फटका
मुसळधार पावसाचा मराठवाड्याला मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 498 छोट्या मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 350 पेक्षा अधिक घरांची आणि गोठ्यांची पडझड झाली आहे. सोबतच 1 हजार 154 गावांना या पावसाचा फटका बसला आहे.
4 लाख 38 हजार 451 शेतकरी पावसामुळे बाधित
मराठवाड्यात 14 ऑगस्टपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये जीवितहानी देखील केली आहे. मराठवाड्यात पावसामुळं आतापर्यंत 11 लोकांचा बळी गेला आहे. 498 छोट्या मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 350 पेक्षा अधिक घरांची आणि गोठ्यांची पडझड झाली आहे. सोबतच 1 हजार 154 गावांना पावसाचा फटका बसला आहे. मराठवाड्यातील 4 लाख 38 हजार 451 शेतकरी पावसामुळे बाधित झाले आहे. तसेच 3 लाख 58 हजार 370.55 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाला आहे.
14 ऑगस्ट ते आज र्यंत मराठवाड्यात पावसमुळे किती मृत्यू झाले? -
जखमी :01
मृत व्यक्ती : 11
जनावरांचा मृत्यू : 498
पडझड झालेली घर-गोठे : 350
बाधित गावे : 1154
बाधित शेतकरी : 438451
शेती नुकसान : 358370.02 हेक्टर
जिल्हानिहाय नुकसान पाहुयात
छत्रपती संभाजीनगर
जनावरांचा मृत्यू : 07
पडझड झालेली घर-गोठे : 71
बाधित गावं : 14
बाधित शेतकरी : 2194
शेती नुकसान : 1252 .67हेक्टर
हिंगोली
मृत व्यक्ती :02
जनावरांचा मृत्यू : 34
पडझड झालेली घर-गोठे : 26
बाधित गावं : 36
बाधित शेतकरी : 58817
शेती नुकसान : 56806 हेक्टर
नांदेड
मृत व्यक्ती : 07
जनावरांचा मृत्यू : 126
पडझड झालेली घर-गोठे : 181
बाधित गावं : 949
बाधित शेतकरी : 324234
शेती नुकसान : 259789 हेक्टर
बीड
मृत व्यक्ती : 02
जनावरांचा मृत्यू : 03
पडझड झालेली घर-गोठे : 06
बाधित गावं : 24
बाधित शेतकरी : 3407
शेती नुकसान : 2045 हेक्टर
लातूर
जनावर मृत्यू-245
पडझड झालेली घर-गोठे : 11
बाधित गावं : 30
बाधित शेतकरी : 2937
शेती नुकसान : 2059 हेक्टर
धाराशिव
जनावरांचा मृत्यू : 53
पडझड झालेली घर-गोठे : 64
बाधित गावं : 108
बाधित शेतकरी : 15590
शेती नुकसान : 15326 हेक्टर
परभणी
जखमी :00
मयत व्यक्ती : 00
जनावरांचा मृत्यू : 21
पडझड झालेली घर-गोठे : 43
बाधित गावं : 06
बाधित शेतकरी : 31172
शेती नुकसान : 21091 हेक्टर
महत्वाच्या बातम्या:
























