एक्स्प्लोर

O Sheth : अखेर 'ओ शेठ' गाण्याच्या मालकी हक्काचा वाद संपुष्टात, मनसेनं घडवून आणला समेट

 "ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट' (O Shet Marathi song) या गाण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय.हेच गाणं चोरीला गेल्याचा आरोप या गाण्याच्या निर्मात्यांनी केला होता. मात्र आता हा वाद संपुष्टात आला आहे.

मुंबई : सोशल मीडियातून (Social Media) कधी कोण हिरो होईल आणि कधी कुणी झिरो होईल हे सांगता येत नाही. आपली एखादी गोष्ट इथं कधी ट्रेंड होईल हे सांगता येत नाही. त्यात यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्ममुळं अनेकांना आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली आहे. काही जणांनी या संधीचं सोनंही केलं आहे. सध्या यूट्यूब, फेसबुक, व्हाट्‌सऍप, इन्स्टाग्रामवर सगळीकडे  "ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट' (O Shet Marathi song) या गाण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. हे गाणं बनवलंय म्हणजे लिहिलं, संगीतबद्ध केलं उस्मानाबादच्या प्रणिकेत खुणे (Praniket Khune) आणि नाशिकच्या संध्या केशे (Sandhya Keshe)यांनी. तर गायलं उमेश गवळी (umesh gawali) यांनी. आता हेच गाणं चोरीला गेल्याचा आरोप या गाण्याच्या निर्मात्यांनी केला होता. नंतर गायक उमेश गवळी आणि गीतकार-संगीतकार संध्या-प्रणिकेत यांच्यातील वाद शिगेला पोहोचला होता. माध्यमांमध्येही यावर बातम्या आल्या होत्या. मात्र आता हा वाद संपुष्टात आला असल्याची माहिती खुद्द संध्या आणि प्रणिकेत यांच्यासह उमेश गवळी यांनीही दिली आहे. 

Web Exclusive : कसं तयार झालं 'ओ शेठ...' गाणं, 'ओ शेठ' कार प्रणिकेत खुणेसोबत थेट गप्पा

अखेर वाद संपुष्टात 

प्रणिकेत आणि संध्यानं यासंदर्भात फेसबुक पोस्ट करुन वाद संपुष्टात आला असल्याचं म्हटलं आहे. आम्ही सर्वांनी सर्व वरिष्ठांच्या सल्ल्यातून मनसेचे नेते अमेय खोपकर यांच्याकडे धाव घेतली. तसेच अखिल भारतीय चित्रपट महामंडळ पुणे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या सांगण्यावरुन उपस्थितांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या त्यातून संध्या-प्रणिकेत यांची बाजू सत्याची आहे हे सर्वांच्या लक्षात आले, असं संध्या प्रणिकेतनं म्हटलं आहे. गायकाने ओ शेठ या गाण्याचे निर्माते, गीतकार, संगीतकार म्हणजेच मालक संध्या केशे आणि प्रनिकेत खुने हेच आहेत हे विना शर्त मान्य केलं आहे,असंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच चित्रपट महामंडळात लवादासमोर कागदोपत्री देखील काही गोष्टी लिहून घेतल्या आहेत, असंही प्रणिकेत यानं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

O Sheth : 'ओ शेठ, तुम्ही नादच केलाय थेट' गाणं चोरीला! गीतकार-संगीतकारांचे गायकावर गंभीर आरोप, गायक म्हणाले

काय केले होते आरोप

एबीपी माझा डिजिटलशी बोलताना प्रणिकेत खुणे आणि संध्या केशे यांनी सांगितलं होतं की, गाण्याचे गायक उमेश गवळी यांनी गाण्याची चोरी केली आहे. या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार आम्ही आहोत आणि आमच्याच युट्युब चॅनेलला गायक उमेश गवळी यांनी स्ट्राईक टाकला. युट्युब चॅनेलला स्ट्राईक टाकल्याने आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले शिवाय आम्हाला आमच्याच कलाकृतीची चोरी झाल्यानं मानसिक त्रास देखील सहन करावा लागला.  प्रणिकेत खुणे म्हणाला की, या गाण्यामुळं मी, प्रणिकेत आणि गायक उमेश गवळी यांना संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेम मिळालं. मात्र गवळी यांनी असं पाऊल उचलल्यानं धक्का बसला आहे असं प्रणिकेत खुणेनं सांगितलं होतं. 

स्ट्राईक टाकल्याने आमचे मोठे आर्थिक आणि मानसिक नुकसान

प्रणिकेतनं एबीपी माझा डिजिटलशी बोलताना म्हटलं की, या गाण्याच्या मेकींग व्हिडिओचे राईट्स आपल्याला मिळावेत अशी विनंती उमेश गवळी यांनी माझ्याकडे केली, वास्तविक उमेश गवळी यांना अतिशय कमी मानधन आम्ही दिले असल्याने त्यांना देखील या गाण्याच्या माध्यमातून जास्तीचे मानधन मिळावे म्हणून आम्ही त्या राईट्स देण्याचे ठरवले. मात्र त्यांनी आमच्याच युट्युब चॅनेलला स्ट्राईक टाकल्याने आमचे मोठे आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले आहे. प्रणिकेत सांगतो की, आम्ही त्यांच्याशी वारंवार मोबाईलवरून संभाषण केले आहे. त्याचे कॉल रेकॉर्डिंग देखील आमच्याकडे आहेत. याबाबत बसून चर्चा करण्यासाठी आम्हाला उमेश गवळी यांनी पुण्याला येण्याचे सांगितले होते. त्यानुसार आम्ही पुण्याला देखील जाणार होतो. मात्र उमेश गवळी यांनी स्ट्राईक काढला नसल्याने आमच्या चॅनेलवरून कॉपीराईटमुळे हे गाणं काढून टाकण्यात आलं, असा आरोप संध्या आणि प्रणिकेत या दोघांनी केला होता. 

संध्या केशेनं म्हटलं होतं की, ओ शेठ गाण्याचे सर्व हक्क आमच्याकडे आहेत. गायक उमेश गवळी यांनी याआधी वेगवेगळ्या माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आमचा वारंवार उल्लेख या गाण्याचे गीतकार-संगीतकार असा केला आहे. असं असताना ते आता अशा पद्धतीने गाण्यावर हक्क सांगत आहेत. याबाबत आम्ही पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितल्यानंतर समेट करू असं सांगणाऱ्या उमेश गवळी यांनी गाण्यावर हक्क सांगितल्याने आमचे उत्पन्नाचे साधनच बंद झाले असल्याचे म्हणत आपल्याला न्याय मिळावा अशी भावना संध्या-प्रणिकेतने व्यक्त केली होती. 

गायक उमेश गवळी काय म्हणाले..
या सर्व प्रकरणावर एबीपी माझा डिजिटलनं ओ शेठ गायक उमेश गवळी यांची बाजू जाणून घेतली होती. गवळी म्हणाले होते की, आम्ही परस्पर समजुतीतून हे गाणं तयार केलं. या गाण्याचं कुणीही एक मालक नव्हतं, आम्ही तिघेही मालक होतो. या गाण्यासाठी त्या दोघांनी माझ्याशी संपर्क केला. मी आधीपासून गाणी गातो. मला या गाण्यासाठी कुठलंही मानधन मिळालं नाही. ऑडिओ त्यांच्या चॅनलला आणि व्हिडीओ माझ्या चॅनलला असं आमचं ठरलं होतं. माझ्या चॅनलला प्रतिसाद मिळाल्यावर त्यांनी माझा चॅनेल ब्लॉक केला. त्यांचे आरोप खोटे आहेत. माझ्याकडे मी गाणं पाठवल्याचे पुरावे आहेत, असं उमेश गवळी म्हणाले होते. गाण्याला माझं काही योगदान नाही असं म्हणणं चुकीचं आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं. 

प्रतिकूल परिस्थितीतून झाली गाण्याची निर्मिती
प्रणिकेत हा उस्मानाबादचा तर संध्या नाशिकची. दोघांनाही कलेची प्रचंड आवड. घरची परिस्थिती बेताची असताना आपलं कलाप्रेम त्यांनी टिकवलं आणि दर्जेदार गाण्यांची निर्मिती केली आहे. या जोडीने तब्बल चार वर्षांपासून एकत्र काम करत जवळपास 50 गाणी लिहिली आहेत आणि संगीतबद्ध केली आहे.  लॉकडाऊनच्या काळात ओ शेठ हे गाणं बनलं. या गाण्याची निर्मिती तीन ठिकाणी झाली. गाणं लिहिलं गेलं उस्मानाबाद आणि नाशिकमध्ये तर गायलं गेलं पुण्यात. त्यानंतरचे संपादनाचे संस्कार हे उस्मानाबादमध्ये झाले. प्रतिकूल परिस्थितीतून बनवलेल्या कलाकृतीवर जवळच्या समजल्या जाणाऱ्या व्यक्तिकडूनच दावा सांगत स्ट्राईक आणल्याने संध्या आणि प्रणिकेत भावूक झाले आहेत. ओ शेठ गाण्याने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. मात्र आता याच गाण्याच्या हक्कावरून नवा वाद निर्माण झाल्याने संध्या- प्रणिकेतला नव्या संघर्षाचा सामना करावा लागत आहे. 

VIDEO : Web Exclusive : कसं तयार झालं 'ओ शेठ...' गाणं, 'ओ शेठ' कार प्रणिकेत खुणेसोबत थेट गप्पा

असं आहे ओ शेठ गाणं

जिथं तिथं चर्चा तुमची हो झालीओ शेठ 
नावाला तुमच्या डिमांड आली
ओ शेSssठ
तुम्ही नादच केलाय थेटSong
ओ शेठ
तुम्ही माणूस हाय लय ग्रेट

नेटवर्क जाम तुम्ही केलया
नाव तुमचं व्हायरल झालया
व्हिडिओत तुमचाच गाजावाजा हाय
कुणावर माझा भरवसा न्हाय

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट
ओ शेठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट

धोकेबाजांना दूर आता केलया
मनात तुम्हालाच ठेवलया
आपला जिगर ट्रिगर तुम्हीच हाय
उगाच बाता मी मारत न्हाय

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट
ओ शेठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट

ट्रेंडिंग अपलोड झालया
उमेश न गाणं गायलया
संध्या प्रनिकेत नावात पावर हाय
मार्केटला गाणं हेच वाजणार हाय

ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट
ओ शेSssठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट…

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget