एक्स्प्लोर

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी! चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना

मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील (Chandrakat Patil) यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे.

Maratha Reservation Latest Update: मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील (Chandrakat Patil) यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे. ही समिती गठित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मान्यता दिली आहे.

या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil), ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), बंदरे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse), राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai), उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचा समावेश आहे. 

ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करेल.

ठाकरे सरकारच्या काळात या उपसमितीचे अध्यक्ष हे अशोक चव्हाण होते. तर एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील हे सदस्य होते. 

मागील महिन्यात झाली होती बैठक

मागील महिन्यात आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर बैठक झाली होती. विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्याआधी होणारी बैठक रद्द करण्यात आली होती.  या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं होतं की,  सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य शासनाची बाजू अधिक सक्षमपणे मांडण्यासाठी अभ्यास करण्यात येईल.तर मराठा आरक्षण संदर्भातील मंत्रिमंडळ उपसमिती सर्व समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेल. मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी या संस्थेला राज्य शासनामार्फत निधी कमी पडू दिला जाणार नाही. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी दिली होती. तर विखे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबतची स्थिती सक्षमपणं मांडण्यासाठी हे शासन प्रयत्न करेल, असं सांगितलं होतं.

बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की, मराठा आरक्षण देण्याबाबत पुढील कार्यवाही करताना यापुढे माझ्यासह मंत्री आणि सचिव सोमवार ते बुधवार  दुपारी 4 ते 6 या वेळेत मंत्रालयात समस्या सोडविण्यासाठी उपस्थित राहतील 

इतर महत्वाच्या बातम्या

Vinod Patil : मराठा आरक्षणाबद्दल 15 दिवसात भूमिका मांडा; विनोद पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा 

Maratha Candidates : मराठा समाजाच्या तरुणांसाठी सरकाकडून आनंदाची बातमी, विविध नियुक्त्या मिळणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
Sangola Vidhansabha : लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : मविआच्या जागावाटपाआधीच ठाकरेंचे पत्ते ओपनAaditya Thackeray On Ashish Shelar :आशिष शेलारांना मेंटल कौन्सिलिंगची गरज,ठाकरे काय बोलले?Zero Hour : मुख्यमंत्रिपदावर शरद पवारांचं सूचक विधान, पवारांकडून अप्रत्यक्ष घोषणा?Zero Hour Guest Center : मविआचा 260 जागांचा तिढा सुटला, 20 ते 25 जागांचा तिढा कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
Sangola Vidhansabha : लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक, 15 मतदारसंघातील उमेदवार ठरले; एबी फॉर्मही दिले?
शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक, 15 मतदारसंघातील उमेदवार ठरले; एबी फॉर्मही दिले?
Vasundhara Oswal : ऑस्ट्रेलियात 'ताजमहाल' बांधणाऱ्या भारतीय वंशाच्या अब्जाधीश उद्योगपतीची लेक युगांडामध्ये कैद! थेट प्लान्टमधून अपहरण
ऑस्ट्रेलियात 'ताजमहाल' बांधणाऱ्या भारतीय वंशाच्या अब्जाधीश उद्योगपतीची लेक युगांडामध्ये कैद! थेट प्लान्टमधून अपहरण
अजित पवारांनी अमोल मिटकरींना आवरावं, नाहीतर बारामतीसह इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे काम करणार नाही, भाजप युवा मोर्चाचा इशारा
अजित पवारांनी अमोल मिटकरींना आवरावं, नाहीतर बारामतीसह इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे काम करणार नाही, भाजप युवा मोर्चाचा इशारा
Multiple Bomb Threats to Indian Flights : भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
Embed widget