एक्स्प्लोर

Maratha Reservation :  मराठा समाजाला दिलासा मिळणार? आरक्षणावरील क्युरेटीव्ह याचिकेवर 24 जानेवारीला सुनावणी होणार

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरील क्युरेटीव्ह याचिका सरकारने स्विकारल्यानंतर आता 24 जानेवारी रोजी या याचिकेवर सुनावणी पार पडली आहे.

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर बुधवार 24 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. दुपारी 1.30 वाजता ही सुनावणी होणार असून न्यायमूर्ती खन्ना आणि न्यायमूर्ती गवई यांच्यासमोर ही सुनावणी पार पडेल. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिका स्विकारली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्याने मराठा आरक्षणाबाबत हा मोठा दिलासा मिळाला असल्याचं म्हटलं जातं होतं. त्यामुळे आता या सुनावणीमध्ये मराठा सामजाला दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

मराठा आरक्षणाच्या याचिकेवर खुल्या कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे सरकारच्या आशा पल्लवित होतील. सरकारला तात्पुरता दिलासा देखील मिळाला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता 24 जानेवारी रोजी होणाऱ्या या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मराठा आरक्षणाबद्दलची क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी असल्याचं वकिलांकडून सांगण्यात आलं होतं. 

सर्वोच्च न्यायालयाने स्विकारली क्युरेटीव्ह याचिका

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर इन-चेंबर ही सुनावणी पार पडली होती. दरम्यान, यावेळी राज्य सरकारने सुनावणीत आपली भूमिका मांडली होती. त्यामुळे, या प्रकरणावर सुप्रीम कोर्ट लवकरच आपला निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात होती. ज्यात क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारले जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील क्युरेटीव्ह याचिका स्विकारली. 

मराठा आणि खुल्या प्रवर्गासाठी मिशन सर्वेक्षण

राज्यभरात राज्य मागासवर्ग आयोगाकडून कऱण्यात येत असलेल्या मराठा (Maratha Reservation) आणि खुल्या प्रवर्गासाठी मिशन सर्वेक्षण मोहिमेस (Mission Survekshan) 23 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. यासाठी संपूर्ण महसूल यंत्रणा सज्ज आहे. याबाबत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे सर्व यंत्रणांनी या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करावे असे निर्देश देण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. तसेच  या कालावधीत नागरिकांनी देखील अचूक माहिती देवून सर्वेक्षणास सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले आहे.

हेही वाचा : 

Bharat Jodo Nyay Yatra : मेघालयात सुरु होणार भारत जोडो न्याय यात्रेचा पुढचा टप्पा, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
Pune Bus Fire : बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक
बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक
शंभूराज म्हणाले, भाजपची भूमिका नेहमीच सोयीस्कर; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, सांगितलं सांगलीतलं गणित
शंभूराज म्हणाले, भाजपची भूमिका नेहमीच सोयीस्कर; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, सांगितलं सांगलीतलं गणित
Bangladesh Election Result 2026: बांगलादेशात कट्टर धर्मांध राजकारण करणाऱ्या जमात ए इस्लामीचा तब्बल 10 पक्षांसोबत युती करूनही निवडणुकीत दारुण पराभव! बांगलादेश निवडणुकीतील 5 टर्निंग पाँईट
बांगलादेशात कट्टर धर्मांध राजकारण करणाऱ्या जमात ए इस्लामीचा तब्बल 10 पक्षांसोबत युती करूनही निवडणुकीत दारुण पराभव! बांगलादेश निवडणुकीतील 5 टर्निंग पाँईट

व्हिडीओ

Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो
Narhari Zirwal On Bribe Case : लाच प्रकरणाचा माझ्याशी संबंध सिद्ध झाला तर राजीनामा दईन
Monkey Attack School Student In Nandurbar : नंदूरबारच्या शाळेत माकडांचा उच्छाद,वनविभाग त्रासातून कधी सुटका करणार? Special Report
Ahilyanagar Saundala : जातमुक्तीच्या संकल्पातून घडलेलं आदर्शगाव 'सौंदाळा' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
Pune Bus Fire : बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक
बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक
शंभूराज म्हणाले, भाजपची भूमिका नेहमीच सोयीस्कर; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, सांगितलं सांगलीतलं गणित
शंभूराज म्हणाले, भाजपची भूमिका नेहमीच सोयीस्कर; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, सांगितलं सांगलीतलं गणित
Bangladesh Election Result 2026: बांगलादेशात कट्टर धर्मांध राजकारण करणाऱ्या जमात ए इस्लामीचा तब्बल 10 पक्षांसोबत युती करूनही निवडणुकीत दारुण पराभव! बांगलादेश निवडणुकीतील 5 टर्निंग पाँईट
बांगलादेशात कट्टर धर्मांध राजकारण करणाऱ्या जमात ए इस्लामीचा तब्बल 10 पक्षांसोबत युती करूनही निवडणुकीत दारुण पराभव! बांगलादेश निवडणुकीतील 5 टर्निंग पाँईट
Mumbai Goregaon Fire: मुंबईत पुन्हा अग्नितांडव, गोरेगावमधील 45 मजली इमारतीला आग; मुंबईत पुन्हा अग्नितांडव, रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले!
मुंबईत पुन्हा अग्नितांडव, गोरेगावमधील 45 मजली इमारतीला आग; मुंबईत पुन्हा अग्नितांडव, रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले!
Bangladesh Election Result 2026: तब्बल वीस वर्षांनी बीएनपीला बांगलादेशमध्ये सत्ता, 35 वर्षांनी पुरुष पंतप्रधान लाभणार; भारताची डोकेदुखी किती वाढणार? शेख हसीनांची सत्तापालट करणाऱ्या पक्षाचं काय झालं?
तब्बल वीस वर्षांनी बीएनपीला बांगलादेशमध्ये सत्ता, 35 वर्षांनी पुरुष पंतप्रधान लाभणार; भारताची डोकेदुखी किती वाढणार? शेख हसीनांची सत्तापालट करणाऱ्या पक्षाचं काय झालं?
Pune Crime News: पत्नीसोबत वारंवार वाद; नंबर ब्लॉक, वाढदिवसाच्या दिवशी बोलण्याचा प्रयत्न पण...,मित्राला अन् पत्नीला मेसेज, मेल करून दरीत मारली उडी
पत्नीसोबत वारंवार वाद; नंबर ब्लॉक, वाढदिवसाच्या दिवशी बोलण्याचा प्रयत्न पण...,मित्राला अन् पत्नीला मेसेज, मेल करून दरीत मारली उडी
NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो; शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो; शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा
Embed widget