एक्स्प्लोर

मराठा आरक्षण पेटलं! मराठवाड्यात 12 बस फोडल्या, आष्टीत तहसीलदाराची गाडी पेटवली

Maratha Reservation : काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा देखील पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात 12 बस फोडण्यात आल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून, आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. गावागावात आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. तर काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा देखील पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात 12 बस फोडण्यात आल्या आहेत. तर जालन्यात महिला तहसीलदाराची गाडी फोडण्यात आली आहे. तर, दुसरीकडे बीडच्या आष्टीत तहसीलदाराची गाडी अज्ञात लोकांनी पेटवून दिली आहे.

धाराशिव जिल्ह्यात 6 बसची तोडफोड

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यात देखील मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात 6 बसची दगडफेक करण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे. धाराशिव ते लातूर या बसवर रविवारी दुपारी दगडफेक करण्यात आली. तसेच, धाराशिव ते औसा या बसवर सांजा गावाजवळल,भूम आगारातील वालवड या बसवर वालवड गावातच, धाराशिव तालुक्यातील कोल्हेवाडी येथे निलंगा - पुणे, तर येडशी येथे धाराशिव -कळंब या बसवर  दगडफेक करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील 144 एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आले आहे.

जालन्यात 4 एसटी बस फोडल्या

धाराशिवप्रमाणे जालना जिल्हा देखील एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. परभणी आगाराच्या तीन बसेसवर परभणीकडे जात असताना जालन्यातील रामनगर ते मंठ्यादरम्यान दगडफेक झाली आहे. सोबतच, जालन्यातून घनसावंगी जाणाऱ्या बसवर घनसावंगीत दगडफेक करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर जवळपास 25 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

जालन्यात तहसीलदारांची गाडी फोडली तर बीडमध्ये पेटवून दिली...

जालना जिल्ह्यातील रामनगर येथे तहसीलदाराच्या गाडीची तोडफोड केल्याची घटना घडलीय, जालना तालुक्यातील बाजीउम्रद गावात मोबाईल टॉवरवर चढलेल्या आंदोलकांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार यांनी चर्चेसाठी येण्याची मागणी होती. दरम्यान, आंदोलनास्थळा जवळून जाणाऱ्या तहसीलदारांची गाडी आडवून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलीय. तर दुसऱ्या घटनेत बीडच्या आष्टीत तहसीलदार यांची गाडी पेटवून देण्यात आली आहे. आष्टीचे तहसीलदार प्रमोद गायकवाड यांची घराच्या आवारात उभी असलेली शासकीय गाडी मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली आहे. या आगीमध्ये तहसीलदारांच्या गाडीचे संपूर्णपणे नुकसान झाले आहे. आग कशाने लागली? किंवा कोणी लावली याचे कारण अस्पष्ट असून, पोलिसांकडून तपास केला जात आहे. अग्निशमन दलाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

यवतमाळच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावर मराठा आंदोलकांच्या रोषाचे सावट; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची गैरहजेरी तर मुख्यमंत्र्यांना विरोध होण्याची शक्यता

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Embed widget