एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

जरांगेंच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही, प्रवीण दरेकरांची बोचरी टीका; अमोल मिटकरींनाही टोला

तुमच्यावरचा मराठा समाजाचा विश्वास गेलेला आहे, मराठा आरक्षणासाठी जे जे करण्यासारखे आहे ते सरकार करत आहे.

मुंबई : मराठा आरक्षणासाठी गेल्या 4 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी ग्रामस्थांच्या आणि मराठा समाज बांधवांच्या आग्रहानंतर आपलं उपोषण स्थगित केलं आहे. अंतरवाली सराटीतील मठाधिपती आणि महिलांच्याहस्ते ज्युस पिऊन त्यांनी उपोषण स्थगित केलं. मात्र, उपोषणकाळात त्यांनी भाजप नेत्यांवर व सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि आमदार प्रसाद लाड यांच्यावरही शेलक्या व शिवराळ भाषेत जरांगे यांनी टीका केली होती. आता, जरांगे यांच्या टीकेला भाजपचे (BJP) हे दोन्ही नेते प्रत्युत्तर देत असून प्रवीण दरेकर यांनी, मी तुमच्या कसल्याही धमक्यांना मी भिक घालत नाही, अशा शब्दांत मनोज जरांगेंवर पलटवार केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (amol Mitkari) यांच्यावरही त्यांनी बोचऱ्या शब्दात टीका केली. 

तुमच्यावरचा मराठा समाजाचा विश्वास गेलेला आहे, मराठा आरक्षणासाठी जे जे करण्यासारखे आहे ते सरकार करत आहे. विधानसभेत महाविकास आघाडीला कशी मदत होईल, हाच त्यांचा हेतू आहे, हे राज्यातील जनतेला समजून आले आहे. त्यामुळे, जरांगे यांच्या नौटकीला मराठा समाज भुलणार नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांना आरक्षणाबाबत तुम्ही का विचारत नाहीत, असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर पलटवार केला आहे. 

आता तुमचा हेतू लक्षात आलेला आहे, त्यांच्या मनात पोटात जे होते ते आज बाहेर आलेले आहे. त्यांना सत्तेची आस लागलेली आहे, कुणाला निवडून आणणार, कुणाला पाडणार यातून सर्व दिसून आलं आहे. मला राजकरणात रस नाही असे जरांगे म्हणतात मग राजकीय का बोलतात, असा सवालही दरेकर यांनी विचारला आहे. जरांगे यांच्या मागे कोण आहे हे वेगळ सांगायची गरज नाही, जरांगेने मराठ्यांचे प्रश्न सोडले असून आता ते राजकीय ओरिएंटल झाले आहेत, त्यांची अपेक्षा आहे मला आता जेलमध्ये टाकावे, त्यांची प्रसिध्दी कमी झाली म्हणून त्यांचा हा अट्टाहास आहे. जरांगे यांच्या डोक्यात अंहकाराची हवा गेलेली आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता प्रश्न सोडवण्याची भूमिका सरकारची आहे. ज्यांच्यासाठी राजकीय पोळी भाजत आहेत त्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातोय, असेही दरेकर यांनी सांगितले. दरम्यान, दरेकर यांनी मनो जरांगेंसह राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनाही उपरोधात्मक टोला लगावला.

ऑन अमोल मिटकरी

अमोल मिटकरी हे व्हेरी व्हेरी व्हीआयपी झालेले आहेत, अशा शब्दात मिटकरी यांना प्रवीण दरेकरांनी टोला लगावला आहे. कारण, अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी अमोल मिटकरींचा फोन उचलला नव्हता, त्यावरुन त्यांनी पालकमंत्री केवल ऑनलाईन असतात, असा टोला लागवला होता. त्यावर, आता प्रवीण दरेकर यांनी प्रत्त्युत्तर दिलंय.  

हेही वाचा

''शरद पवार अन् जरांगेंची समांतर लाईन, ते निवडणूक लढवू शकत नाहीत, हे माझ्याकडून कागदावर लिहून घ्या''

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaBJP Vidhan Sabha Winning plan Sanjay Bhende: बुथ टू बुथ मार्किंग;भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यशABP Majha Headlines :  9 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Maharashtra : शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
Embed widget