एक्स्प्लोर
MCA Election Row: एमसीए निवडणुकीत नवा वाद, नोंदणीच नसल्याने 156 क्लब्जचं सदस्यत्व रद्द होणार?
मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association), म्हणजेच एमसीएच्या (MCA) त्रैवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. एमसीएला संलग्न असलेल्या फ्रेंड्स क्रिकेट क्लबचे सचिव श्रीपाद हळबे (Shripad Halbe) यांनी निवडणूक अधिकारी जे. एस. सहारिया (J. S. Saharia) यांना पत्र लिहून काही गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. हळबे यांच्या दाव्यानुसार, ‘एमसीएला संलग्न असलेल्या २१३ मैदान क्लब्सपैकी १५६ क्लब्सची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झालेली नाही, त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे’. या पत्रामुळे ऐन दिवाळीत निवडणुकीच्या वातावरणात हरकतींचे फटाके फुटले आहेत. हळबे यांनी मार्च महिन्यातील क्लब प्रतिनिधींची यादी ग्राह्य धरून हा आक्षेप नोंदवला आहे. या १५६ क्लब्सचे सदस्यत्व रद्द झाल्यास, त्यांचे प्रतिनिधी आगामी निवडणूक लढवू शकणार नाहीत किंवा मतदानही करू शकणार नाहीत, याकडे हळबे यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Malgaon Protest : जनआक्रोश मोर्चात गोंधळ, मोर्चेकरांचा गेट तोडून न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न
Sayaji Shinde on Nashik Tree Cutting : 100 माणसे मरु पण एकही झाड तोडू देणार नाही,सयाजी शिंदे आक्रमक
Jyoti Waghmare on Nashik Malegaon : 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, ज्योती वाघमारे अश्रू अनावर
Shivsena vs BJP Rada : एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाणांमध्ये नाराजीनाट्य असतानाच कार्यकर्त्यांचा राडा
Uddhav Thackeray MNS - MVA Alliance : मनसे-मविआसाठी ठाकरे प्रयत्नशील?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















