एक्स्प्लोर

Maratha Candidate in MVA : मविआकडून 28 मराठा, 8 ओबीसी उमेदवार, एकही मुस्लीम नाही, ठाकरे-पवारांकडून कुणाकुणाला तिकीट?

Maratha Candidate in MVA : मराठा आणि ओबीसी राजकारणाचा विचार करता महाविकास आघाडीने घोषित केलेल्या जागावाटपात राज्यात  28 मतदारसंघात मराठा उमेदवारांना तिकीट देण्यात आलं आहे.

Maratha Candidate in MVA : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्रात सध्या राजकारण फिरत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी विविध मार्गांनी मराठा आरक्षण मुद्दा केंद्रस्थानी आणल्यानंतर सरकारने वेगळा कायदा करून आरक्षण दिलं असलं तरी मराठा समाजाचे पूर्णत: समाधान झालेलं नाही. 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीत 26 उमेदवार मराठा उमेदवार 

या सर्व पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी राजकारणाचा विचार करता महाविकास आघाडीने घोषित केलेल्या जागावाटपात राज्यात  28 मतदारसंघात मराठा उमेदवारांना तिकीट देण्यात आलं आहे. उद्धव सेनेकडून सर्वाधिक 21 पैकी 16 मराठा उमेदवारांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसची व्होट बँक असणाऱ्या मुस्लिम समाजाला मात्र सध्या घोषित केलेल्या महाविकास आघाडीच्या यादीत अजून उमेदवारी मिळालेली नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत 26 उमेदवार मराठा तर आठ उमेदवार ओबीसी आहेत. एकही मुस्लीमउमेदवार नाही

मराठा उमेदवारीला उद्धवसेनेने दिले प्राधान्य

महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरुन राजकारण ढवळून निघाले आहे. उद्धव सेनेने सर्वाधिक 16 उमेदवार मराठा दिले आहेत, तर तीन ओबीसी एक अनुसुचित जाती आणि एक अनुसुचित जमाती असे उमेदवार दिले आहेत.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घोषित नऊपैकी सहा मराठा उमेदवार

दुसरीकडे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामध्ये सहा उमेदवार मराठा आहेत. तर दोन ओबीसी आणि एक अनुसुचित जमातीचे उमेदवार आहेत. महायुतीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दहा जागा आल्या आहेत. यामध्ये माढाची जागा घोषित होणे बाकी आहे.

मराठवाड्यात काय स्थिती? 

मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघ असून महाविकास आघाडीने आपले सर्व उमेदवार घोषित केले आहेत. हविकास आघाडीने 6 मराठा आणि एससी समाजाचे उमेदवार दिले आहेत. महायुतीने मराठवाड्यातील आठ पैकी सात उमेदवार घोषित केले आहेत. यामध्ये चार ठिकाणी मराठा उमेदवार दिले आहेत. एक एससी, तर छत्रपती संभाजीनगर येथे उमेदवार घोषित करण्यात आला नाही. एमआयएमने मराठवाड्यातील 1 जागा घोषित केली असून इम्तियाज जलील मुस्लिम उमेदवार आहेत. 

काँग्रेस घोषित 15

  • सहा मराठा 
  • तीन ओबीसी
  • चार अनुसुचित जाती
  • एक- एसटी

शिवसेना घोषीत 21

  • मराठा - 16
  • ओबीसी -03
  • अनुसुचित जाती - 01
  • अनुसुचित जमाती-01

राष्ट्रवादी काँग्रेस - घोषित 9

  • मराठा- 6
  • ओबीसी-02
  • अनुसुचित जमाती -01

 धाराशिव

ओमराजे निंबाळकर, मराठा  (महाविकास आघाडी)
अर्चना राणाजगजीत सिंह पाटील (मराठा - महायुती)
डॉ नवनाथ दुधाळ, लिंगायत-वाणी (विश्व शक्ती पार्टी)
अर्जुन सलगर, धनगर (ओबीसी बहुजन पार्टी)

परभणी 

संजय जाधव, मराठा (महाविकास आघाडी)
महादेव जानकर (ओबीसी- महायुती) 
पंजाब डख, मराठा (वंचित बहुजन आघाडी  मराठा) 

नांदेड  

वसंत चव्हाण - मराठा (काँग्रेस )
प्रताप पाटील - मराठा (भाजप)
अविनाश भोसीकर - लिंगायत (वंचित)

हिंगोली 

महायुती, बाबुराव कदम मराठा (शिवसेना)
नागेश पाटील आष्टीकर मराठा (शिवसेना, महाविकास आघाडी)
डॉ. बी. डी. चव्हाण बंजारा (वंचित)

जालना

रावसाहेब दानवे, मराठा (भाजप)
डॉ.कल्याण काळे, मराठा (काँग्रेस)
प्रभाकर बकले, धनगर (वंचित)
तानाजी भोजने, धनगर (ओबीसी बहुजन पार्टी) 

बीड

पंकजा मुंडे, ओबीसी -वंजारी (भाजप) 
बजरंग सोनवणे, मराठा (महाविकास आघाडी)

लातूर लोकसभा एससीसाठी राखीव 

सुधाकर शृंगारे, महार बुद्धीस्ट (भाजप)
नरसिंग उदगीरकर, मातंग (वंचित बहुजन आघाडी)
डॉ. शिवाजीराव काळगे, माला जंगम (काँग्रेस)

छत्रपती संभाजीनगर 

महायुती उमेदवार ठरला नाही
चंद्रकांत खैरे, अनुसूचित जाती (बुरुड) - ठाकरे गट
इम्तियाज जलील, मुस्लिम (एमआयएम) 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 News : टॉप शंभर बातम्यांचा आढावा : 01 February 2025 : ABP MajhaZero Hour | Namdev Shastri On Dhananjay Munde | नामदेवशास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण,विरोधकांचे सवालZero Hour Full |Namdev Shastri यांच्याकडून पाठराखण, Anjali Damania भगवानगडावर जाणार; पुढे काय घडणार?Zero Hour | Nagpur | महापालिकेचे महामुद्दे | रिंग रोडवरील साडे पाचशे झाडं कोणी कापली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget