एक्स्प्लोर
आजारी पतीवर उपचाराचा बहाणा, पुण्यात मांत्रिकाचा महिलेवर बलात्कार
पतीवर उपचार करण्यासाठी बोलवलेल्या मांत्रिकाने महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार पुण्यातील येरवडा भागात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पुणे : रुग्णावर उपचार करण्याच्या बहाण्याने आलेल्या मांत्रिकाने रुग्णाच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. गुंगीचं पेय देऊन 45 वर्षीय मांत्रिकाने महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पुण्यातील येरवडा पोलिसांनी मांत्रिक शब्बीर युनूस शेखला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याविरुद्ध बलात्कार आणि जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मांत्रिकाला 13 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पती काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे पीडितेने पतीवर उपचार करण्यासाठी मांत्रिकाला घरी नेलं. मांत्रिकाने पतीवरुन लिंबू कापूर यांचा उतारा टाकला आणि त्याला भूतबाधा झाल्याचं सांगितलं. पतीला बरं करण्याच्या बहाण्याने त्याने महिलेला पेय दिलं. मात्र त्यात गुंगीचं औषध मिसळलेलं असल्यामुळे महिला बेशुद्ध झाली.
या संधीचा फायदा घेत मांत्रिकाने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याबाबत कोणाला सांगितल्यास पतीला जीवे मारण्याची धमकीही मांत्रिकाने दिल्याचा दावा तिने केला आहे.
पतीला बरे करण्यासाठी वेळोवेळी उतारे आणि जादूटोण्यासाठी मांत्रिकाने सुमारे साडेतीन लाख रुपये उकळले होते. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी शब्बीर शेख याला अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement