एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil Wife : ताट वाढताना त्यांचीच आठवण येते, आम्ही जेवतो पण आमचा माणूस उपाशी; आमरण उपोषणाने जरांगेंच्या पत्नी गहिवरल्या

Manoj Jarange Patil Wife : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला बसण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Manoj Jarange Patil Wife : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला बसण्याची ही पहिलीच वेळ नाही. जरांगे यांच्या उपोषणाबद्दल त्यांची पत्नी  सौमित्रा जरांगे (Saumitra Jarange) यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. "खूप दुःख वाटत आपण जेवतो पण तिथे आपला माणूस उपाशी असतो. किती दिवस आपले पती सलाईनवर राहतील सरकार ताबडतोब अंमलबजावणी करावी, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांच्या पत्नी  सौमित्रा जरांगे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केली. मराठा समाजाला विनंती आहे की,  छत्रपती शिवरायांच्या जयंती दिवशी कुठेही गालबोट लागु नये याची काळजी घ्यावी, असे आवाहनही सौमित्रा जरांगे यांनी केले. 

'किती दिवस असच सलाईनवर राहणार, सरकारने अंमलबजावणी करावी'

मनोज जरांगे यांच्या पत्नी म्हणाल्या, "ते मान टाकून देत होते तेव्हा मला भीती वाटत होती. काळजी आणखीही वाटत आहे. किती दिवस असच सलाईनवर राहतील, सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी केली तर जेवण लवकर करतील. 

पप्पा लवकरच आरक्षण घेऊन येतील, जरांगेंचा मुलगा काय म्हणाला? 

पप्पा लवकरच आरक्षण घेऊन येतील त्यांनी लवकरात लवकर उपचार घ्यावेत, असे आम्हाला वाटत होतं त्यांनी सलाईन घेतल्यामुळे आम्हाला थोडा दिलासा मिळाला. पप्पांच्या नाकातून होणारा रक्तस्राव किमान टाकत असताना खूप दुःख होत होतं. पप्पांनी उपोषण सोडायला पाहिजे होतं, पण सरकार त्याशिवाय गांभीर्यने घेत नाही. त्यामुळे ते उपोषणाचा हत्यार उपसतात, असे जरांगे यांचा मुलगा शिवराज जरांगे म्हणाला. 

आंदोलन स्थळी भेटायचं नाही, मुलीला जरांगेंनी काय सांगितलं?

पप्पांनी आंदोलन स्थळी भेटायचं नाही असं सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही जात नव्हतो त्यांचा शब्द आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. मला खूप भीती वाटते पप्पांची तब्येतीबद्दल त्यामुळे मला  रडायला येतं. सरकारने लवकरात लवकर आणि गांभीर्याने दखल घ्यावी जेवढ्या लवकर अधिवेशन घेता येईल कायदा करावा, अशी प्रतिक्रिया पल्लवी जरांगे हिने व्यक्त केली. 

आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही : मनोज जरांगे 

कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी आरक्षण आणि कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना नवं आरक्षण असं सांगणं चुकीचं आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी करावीच लागेल, असे मनोज जरांगे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे त्यांना कायदा करावाच लागेल. ईसीबीसीचं आरक्षण दीड वर्ष झालं. राज्यभर निवडी झाली, पण ते आरक्षण गेले. नियुक्ती द्या म्हणून आणखी आंदोलन सुरु आहे. आमचं हक्काचं ओबीसीचं आरक्षण केंद्रात आणि राज्यातही हवेय, असे मनोज जरांगे म्हणाले. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असेही यावेळी मनोज जरांगे यांनी सांगितलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Maratha Reservation: 40 टक्के लोकांचा मराठा समाज मागास असल्याचा अभिप्राय, विनोद पाटलांची प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाहीEknath Shinde Bag Checking | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाहीSaleel Deshmukh :  हा रडीचा डाव; षडयंत्र रचणारा कोण आहे ? हे जनतेला माहित आहे - देशमुखDevendra Fadnavis on Chandiwal : मविआ काळातील भ्रष्टाचाराचे मोठे पुरावे समोर आले - फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Karanja Assembly Election : भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
Embed widget