बेटा लय चूक केली, तू नेता म्हणून वागायला पाहिजे होतं; जीवे मारण्याच्या कट रचणाऱ्याबद्दल जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट
मला धमकी देणारी औलाद पैदा होऊ शकत नाही असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.
Manoj Jarange Patil : मला धमकी देणारी औलाद पैदा होऊ शकत नाही असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. तो तपासाचा आणि चौकशीचा भाग आहे. जालना जिल्ह्याचे एसपीसाहेब पूर्ण लक्ष घालून आहेत. ते कोल्हापूरपर्यंत जातील याची आम्हाला खात्री आहे. खूप मोठे षडयंत्र कट रचला गेला आहे असे जरांगे म्हणाले. जर नेता असशील तर तू चुकीच्या ठिकाणी हात टाकला हे विसरून गेलास. तू तुझे करिअर करायला पाहिजे होतं असेही जरांगे म्हणाले.
असल्या पैदाशीला मी गिनत नाही
एका नीट वृत्तीने हा कट आणि घाट रचला आहे, असल्या पैदाशीला मी गिनत नाही असे जरांगे पाटील म्हणाले. जर नेता असशील तर तू चुकीच्या ठिकाणी हात टाकला हे विसरून गेलास. तू तुझे करिअर करायला पाहिजे होतं. तुला सुट्टी मिळत नसते. घटना खूप गंभीर आहे. करणाऱ्यापेक्षा करवून घेणाऱ्याला पहिले उचलले पाहिजे. चुकीच्या ठिकाणी हात घातला आहे. जो माणूस रोज कपाळ पुसून येतो वेळ आली तर रक्त सांडायला भीत नाही असे जरांगे पाटील म्हणाले. समाजाला माझ्या आव्हान आहे की त्यांनी शांत राहावं. ही गोष्ट करायची एवढी टप्पर नाही कोणाची. त्यांनी त्याला हे सांगणं आहे तू करायचे अगोदर हे सगळं नेटवर्क टोळी याला मी भेदल आहे. याच्यावरती फडणवीस साहेब गांभीर्याने लक्ष देतील असे जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, त्यात काय गंभीर खुलासे झाले की नाहीत हे मला माहित नाही. तो तपासाचा आणि चौकशीचा भाग आहे. जालना जिल्ह्याचे आमचे एस पी साहेब यात लक्ष घालून आहेत. ते खोलापर्यंत जाणार आहेत. मला धमकी देणारी औलाद पैदा होऊ शकत नाही असे जरांगे म्हणाले. पण हे सत्य आहे की खूप मोठा षडयंत्र कट रचला गेला आहे. एका नीच वृत्तीने हा कट रचला आहे. बाळ एक लक्ष ठेव तू जरी नेता असशील तर चुकीच्या ठिकाणी हात टाकला आहे तू असे जरांगे म्हणाले.
घटना खूप गंभीर, करणाऱ्यापेक्षा करवून घेणाऱ्यांनी खूप चुकीचं पाऊल उचललं
घटना खूप गंभीर आहे. करणाऱ्यापेक्षा करवून घेणाऱ्यांनी खूप चुकीचं पाऊल उचललं आहे. खूप चुकीच्या ठिकाणी हात घातला आहे. माझं समाजाला आवाहन आहे की तुम्ही शांत राहावं. करणाऱ्या नेत्याला एक लक्षात ठेव म्हणाव तू इथून पाठीमागे काय केले कुणाला कळालं नाही. तुझ्या आयुष्यातली पहिली वेळ असेल की तू करायच्या अगोदर तुला आम्ही भेदल आहे. याचा अर्थ तू समजून घे आमचेही हात खूप लांब आहेत. आम्ही कच्चे नाहीत. मला सगळीकडून माहिती मिळते प्रशासनातून आणि शासनातून नेत्याकडून देखील असे जरांगे म्हणाले. आता हे असं शिजून ठेवलंय पण आता हे सगळे येणार आहे, आता यांना सुट्टी नाही. पैसे पाण्याच्या अशासाठी करायला गेले. तुम्ही त्यांच्या अमिषापोटी दहा पाच रुपये कमवण्यासाठी जातात, आयुष्याला मुकाल, आयुष्यभर जेलमध्ये सडताल असे जरांगे म्हणाले.
पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्यापैकी तुमचा जुना सहकारी आहे असं प्रश्नही प्रसारमाध्यमांनी जरांगेंना केला. याबाबत ते म्हणाले की, मला बाकीचं काहीही माहित नाही, त्याच्याबद्दल उद्या भूमिका मांडणार आहे. काय असं नसेल ते सगळं पोलीस बघतील. ही खूप मोठी साखळी आहे, हे गंभीर प्रकरण आहे. हा खूप मोठा डाव आणि कट आहे. मी सच्चा मराठा समाजासाठी काम केलं आहे. अडीच कोटीत किंमत ठरल्याचे चर्चा आहे. याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, लय मोठी आहे, मी त्याच रेकॉर्डिंग ऐकत आहे. मी उद्या सकाळी 11 वाजता नावानिशी मांडणार आहे. फडणवीस साहेबांनी याच्यात बारकाईने लक्ष घालणं गरजेचं आहे. बेटा तू लय चूक केली चुकीच्या ठिकाणी हात टाकला. तू नेता म्हणून वागायला पाहिजे होतं असे जरांगे म्हणाले. पोलीस तपास करत आहे पोलीस कोणालाही सोडणार नाहीत नेत्यापर्यंत जाणार आहेत. कारण त्याचे रेकॉर्डिंग आहे त्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत, त्यामुळे हे कुठेही झाकू शकत नाही असे जरांगे पाटील म्हणाले.























