एक्स्प्लोर

Manoj Jarange : 'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी'; मनोज जरांगे पाटलांचं जोरदार टीकास्त्र

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात आमदार उभे केले आहेत. ही त्यांची चाल आहे असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात आमदार उभे केले आहेत. ही त्यांची चाल आहे. मराठा का संपवायला निघाला आहात? 106 आमदार मराठ्यांनी निवडून दिले आहेत. आम्ही आमचे आरक्षण मागत आहोत.  देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी आहे, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केली आहे. शिरूर मतदार संघातील पिंपळवंडी येथील घोंगडी बैठकीतून ते बोलत होते. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही ही सर्वांची इच्छा आहे. हा समाज बलाढ्य आहे. समाज प्रगत होईल म्हणून आरक्षण मिळू द्यायचं नाही. अनेक जणांनी देव पाण्यात ठेवले आहेत. राजकीय पक्षातील लोक आपल्यात फूट पाडत आहेत. फूट पडण्यासाठी सरकारने आंदोलन उभे केले असल्याची टीका त्यांनी केली आहे. 

हैदराबाद गॅझेट लागू करायला अडचणी काय आहेत?

ते पुढे म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे भावनिक केलं जाणार आहे. प्रत्येक राजकीय नेता पक्ष वाचवण्यासाठी निघाला आहे. अफाट संपत्ती केवळ मराठा समाजाच्या जीवावर आहे. हीच अवलाद मराठा समाजाला आरक्षण मिळू देत नाही. आरक्षणावर कोणीच बोलायला तयार नाही. सगे सोयरेची अधिसूचना काढली, आठ महिने झाले तरीही अंमलबजावणी नाही. हैदराबाद गॅझेट लागू करायला अडचणी काय आहेत? ही अडवणूक कशामुळे सुरू आहे. सरकारची भूमिका कळायला तयार नाही.  

जो आमदार बोलणार नाही त्याला पाडायचं

मराठा आणि कुणबी एकच आहे. मराठे जे मागतात ते तुम्ही देत नाही आणि जे आम्ही मागत नाही ते तुम्ही देता, यात आमची चूक काय आहे? ईडब्लूएस रद्द करण्याचा घाट का घातला? सरकार याचे उत्तर देत नाही. देवेंद्र फडणवीस सर्व चालवतात त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही मागतो. सरकारने अधिवेशन बोलवावं, जो आमदार बोलणार नाही त्याला पाडायचं. नाटक कंपनीने नौटंकी करायची नाही, अधिवेशन बोलवायचं मग समाज बघेल कोणता आमदार बोलणार नाही. यांना अधिवेशन ठेवायचं नाही हे नाटक आणि बहाणा आहे, अशीही टीका त्यांनी यावेळी केली. 

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी 

आता फूट पडू द्यायची नाही आणि कोणत्याही नेत्याला घाबरायचं नाही. 2024 ला एका-एका काठीचा हिशोब घ्यायचा आता सुट्टी नाही. माझ्या विरोधात खूप टोळ्या आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात आमदार उभे केले आहेत ही त्यांची चाल आहे. मराठा का संपवायला निघाला आहात? 106 आमदार मराठ्यांनी निवडून दिले आहेत. आम्ही आमचे आरक्षण मागत आहोत. माझे कर्तव्य मी पार पाडत आहे. मी सरकारला मॅनेज होत नाही. त्यांनी माझ्याविरोधात आंदोलन उभे केले आहे. मी एकटा वटणीवर आणतो. देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी आहे, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. 

आणखी वाचा 

मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget