नोंदी आढळल्या त्यांना प्रमाणपत्र का दिले जात नाही? पुन्हा आंदोलनाचा विचार करावा लागेल, मनोज जरांगेंचा इशारा
ज्यांच्या नोंदी आढळल्या त्यांना प्रमाणपत्र का दिले जात नाही हे आम्ही पाहतोय. नाहीतर आम्हाला पुन्हा आंदोलनाचा विचार करावा लागेल, असे मनोज जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Patil : ज्यांच्या नोंदी आढळल्या त्यांना प्रमाणपत्र का दिले जात नाही हे आम्ही पाहतोय. नाहीतर आम्हाला पुन्हा आंदोलनाचा विचार करावा लागेल, असे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असेही जरांगे पाटील म्हणाले. दोनशे वर्षांपूर्वीच्या नोंदी असूनही प्रमाणपत्र दिले जात नाही म्हणून मुख्यमंत्र्यांबद्दल चीड निर्माण होते असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
सरकार आणि काही अधिकारी नोंदी असून जाणून बुजून अडथळे निर्माण करत आहे
सरकार आणि काही अधिकारी नोंदी असून जाणून बुजून अडथळे निर्माण करत आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगीतले आहे की एकही प्रमाणपत्र थांबविणार नाही हे त्यांनी सांगितले आहे. शिंदे समिती सुरु करण्यासाठी सुद्धा मला आश्वासन दिले आता आम्ही वाट पाहतोय असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. पनवेलमध्ये मराठा बांधवांनी मराठा भवन बांधले आहे. हे उपक्रम राज्य भर होणे गरजचे आहे. हा चांगला उपक्रम त्यांनी राबवला आहे असेही ते म्हणाले.
सर्व जातींच्या आरक्षणाचे विषय पेंडिंग पडले आहेत
आता अधिवेशनात त्यांच्या त्यांच्यातच दोन दिवस लफडे चालतील. हे सगळे शेतकऱ्यांचे वाटोळ करणार शेतकऱ्यांना काही देणार नाही असे मनोज जरांगे म्हणाले. सर्व जातींच्या आरक्षणाचे विषय पेंडिंग पडले आहेत. सरकारला आयडिया आली असून त्यांनी लोकांची नस ओळखली आहे. हैदराबादचे गॅजेट्स काढून तीन महिने झालेत त्यावर अजून समिती नाही. राधाकृष्ण विखे पाटलांनी शब्द दिलाय त्यांच्यावर विश्वास ठेवलाय. हे लई चाभरे आहेत सत्ताधारी असो किंवा विरोधक. शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार तर आदेश द्यावेत असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
चांगले काम करतो म्हणून माझा घातपात करायचा निघालेत
माझ्यावर आता जळायला लागलेत मी चांगले काम करतो म्हणून माझा घातपात करायचा निघाल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मी संरक्षण नाकारले माझ्यासोबत एक पोलीस तरी दिसतोय का? त्याला दम लागतो. नार्को टेस्ट वाले आता कुठे गेले त्यांनी पुढ यायला पाहिजे टेस्ट केली पाहिजे. मला जात मोठी करायची आहे आणि जात मला उघड पाडत नाही. जर घातपात करणाऱ्या आरोपींनी जबाब दिलाय की धनंजय मुंडे यांनी सांगितले होते. जालन्याच्या एसपी ने गृहमंत्र्याचे एकूण धनंजय मुंडे यांना अटक करण्याची परवानगी का घेतली नाही. तीन आरोपी आहेत त्यांनी मान्य केले नसते तर वेगळे होते. पुढच्या काळात याचे पडसाद खूप वाईट होणार आहेत. आरोपींची आणि आमची नार्को टेस्ट करा असेही मनोज जरांगे म्हणाले. सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक मनोहर वाडेकर यांना मातृषोक झाला त्याचे सांत्वन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या चाकण मध्ये आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
























