288 जागा पाडणार, ओबीसीतूनच आरक्षण घेणार, माझ्यामागं भयंकर वादळ, जरांगे पाटलांचा थेट इशारा
सरकारनं संभ्रमात राहू नये, मी सरकारला सावध करतोय. आम्ही 100 टक्के 288 जागा पाडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला.
Manoj Jarange Patil : सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही. सरकारनं संभ्रमात राहू नये, मी सरकारला सावध करतोय. आम्ही 100 टक्के 288 जागा पाडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला. आम्ही 100 टक्के ओबीसीतूनच (OBC) आरक्षण घेणार आहे. मी थांबतो, गरबड करत नाही, कारण त्यामागं भयंकर वादळ असतं असेही जरांगे पाटील म्हणाले. आजचा दिवस थांबू, नंतर समाजाशी चर्चा करुन काय करायचे ते ठरवू असे जरांगे पाटील म्हणाले.
सरकार लबाड, ओबीसींना मराठ्यांच्या अंगावर घालण्याचे काम
सरकार लबाड आहे. ओबीसींना मराठ्यांच्या अंगावर घालण्याचे काम करत आहे. मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळं त्यांना आरक्षण द्या असेही जरांगे पाटील म्हणाले. माझी सरकारला शेवटची विनंती आहे, लाखोंच्या संख्येनं माता माऊली रस्त्यावर येत आहेत. आम्हाला वेदना होत आहेत. मराठ्यांना हक्काचं आरक्षण द्या असेही जरांगे पाटील म्हणाले. लोक आता पक्ष बघायला तयार नाहीत. ओबिसींनी समजून घ्यावं, की विरोध केला नाही आणि केला तरी मराठ्यांचेच सरकार येणार आहे. त्यामुळं तुम्ही विरोध करु नका असे जरांगे पाटील म्हणाले. मी खूप संयमाने घेतो. मी कोणाला हवं म्हणून बोलत नाही, मी शांततेत सगळा कार्यक्रम करतो असेही जरांगे पाटील म्हणाले. आजचा दिवस आम्ही वाट भगणार आहे. सरकार काय निर्णय घेतो ते पाहू की सरकार मराठ्यांची फसवणूक करणार ते आज समजेल. महाराष्ट्राला विचारुन पुढचा निर्णय घेणार आहे. आमचा पुढचा रॅलीचा टप्पा हा पश्चिम महाराष्ट्रातून सुरु होणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीचा समारोप
मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षण शांतता रॅली आणि सभा घेतल्यानंतर आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) छत्रपती संभाजीनगरमध्ये रॅलीचा समारोप करणार आहेत. सगेसोयऱ्यांसह सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देत आद्यादेश काढण्यासाठी सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपणार आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये 11.30 वाजता निघणाऱ्या रॅलीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक एकत्र येणार असून शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. या रॅलीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली असून शहरातील वेगवेगळ्या 8 चौकांमध्ये तब्बल 300 क्विंटल जेवण तयार करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या: