(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी हिंगोलीकर सज्ज, स्वागतासाठी 40 फूट लांब आणि 150 किलोचा हार
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आजपासून मराठवाड्याचा दौरा सुरू करत आहेत. या दौऱ्याची सुरुवात हिंगोली जिल्ह्यापासून होणार आहे.
Manoj Jarange Patil Hingoli : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आजपासून मराठवाड्याचा दौरा सुरू करत आहेत. या दौऱ्याची सुरुवात हिंगोली जिल्ह्यापासून होणार आहे. हिंगोली (Hingoli) शहरामध्ये जनजागृती शांतता रॅली काढली जाणार आहे. दुपारी 12 वाजता ही रॅली निघणार असून काहीच वेळात मनोज जरांगे हिंगोली शहरांमध्ये दाखल होणार आहे. शहरालगत असलेल्या बळसोंड येथे मनोज जरांगे यांचं स्वागत केलं जाणार आहे. जरांगे यांच्या स्वागतासाठी तब्बल 40 फूट लांब असलेला आणि दीडशे किलो वजनाच्या गुलाब फुलांच्या तयार करण्यात आला आहे.
हिंगोली शहरात रॅलीच्या पार्श्वभूमीवर भव्य तयारी
जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तब्बल 40 फूट लांब असलेला हार तयार करण्यात आला आहे. त्यासाठी हार घेऊन दोन क्रेन रस्त्यावर सज्ज झाली आहेत. हिंगोली शहरात रॅलीच्या पार्श्वभूमीवर भव्य तयारी पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या रॅलीला सुरुवात होणार असून, हिंगोली शहरातून ही रॅली निघणार आहे.
कसा असणार मनोज जरांगे यांच्या रॅलीचा मार्ग?
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा - पोस्ट ऑफिस रोड - आखरे मेडिकल - खुराना पेट्रोल पंप चौक महात्मा गांधी चौक - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा (बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करतील) -महात्मा गांधीजींचा पुतळा (महात्मा गांधीजींना अभिवादन करतील)- पुढे इंदिरा गांधी चौक असा रॅलीचा मार्ग आहे. शेवटी इंदिरा गांधी चौकामध्ये जरांगे पाटील यांचे समारोपीय भाषण होमार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरामध्ये आता हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.
6 जुलै ते 13 जुलैपर्यंत ही जनजागृती रॅली आणि शांतता रॅली काढणार
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) शांतता रॅलीला (Shantata Rally) आज हिंगोलीतून (Hingoli) सुरुवात होणार आहे. जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असून 13 तारखेनंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. दरम्यान, हिंगोलीत जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी साडेअकरा वाजता जरांगेंच्या शांततात रॅलीला सुरूवात होणार आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली काढणार आहे. शनिवारी 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत ही जनजागृती रॅली आणि शांतता रॅली काढणार आहे. ही रॅली राज्यभरात टप्प्याटप्यानं घेतली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या: