मराठ्यांना आरक्षण दिलं नाहीतर पुढं काय? जरांगे पाटलांनी सांगितला प्लॅन, म्हणाले...
आम्हाला राजकारणात जायचं नाही हे मी वारंवार सांगत आहे. पण सरकारनं आम्हाला हालक्यात घेऊ नये, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केलं, ते लातूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
Manoj Jarange Patil : आम्हाला राजकारणात जायचं नाही हे मी वारंवार सांगत आहे. पण सरकारनं आम्हाला हालक्यात घेऊ नये. आम्ही जर कृती सुरु केली तर तुम्हाला आयुष्यातील सगळ्यात मोठा पश्चाताप होईल, असा इशारा मनोज जरांग पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे. आम्हाला जर आरक्षण देणारचं नसाल तर आमच्यासमोर पर्याय काय? मग आम्हाला आरक्षण देणाऱ्यांच्या जागेवरच जावं लागेल असंही जरांगे पाटील म्हणाले.
राजकारणात जाणार नाही, पण ...
आम्हाला आरक्षण दिले नाहीतर, आरक्षण देणाऱ्यांच्या जागेवर आम्हाला जावं लागेल असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते लातूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. आम्हाला राजकारणात जायचं नाही. पण वेळ आली तर मी राजकारण जाणार नाही, पण 288 उभे करायचे की पाडायचे हे बैठक घेऊन समाज ठरवणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. पाच सहा समाजाचे लोक एकत्र येऊन लढाई लढू असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आरक्षणासाठी मराठा नेते एकत्र येत नाहीत याचं दु:ख
ओबीसी नेते एकत्र आले तसे राजकारणाताली तगडे मराठा एकत्र येत नाहीत.आपल्या लेकराबाळांसाठी हे एकत्र येत नाहीत. ज्या मराठ्यांना आम्ही मोठं केलं ते आमच्यासोबत नाहीत याच दु:ख असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ज्यांना आम्ही मोठं केलं तेच आमच्या आन्नात माती कालवण्याचे काम करत असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आम्ही ना महाविकास आघाडीचे ना महायुतीचे
दरम्यान, आम्ही आमच्या मतांवर ठाम आहोत. आम्ही कोणाचेच नाही. महाविकास आघाडीचे नाही ना महायुतीचे नाही. ओबीसीचे नेते एकत्र येतात तर मराठ्यांचे नेते एकत्र का येत नाहीत असेही जरांगे पाटील म्हणाले. मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्या आहेत. आमच्यामुळं धनगर आरक्षणाच्या बांधवाला धक्का लागत नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. आमच्या नोंदी रद्द होणार नाहीत असंही जरांगे पाटील म्हणाले.
राज्यात मराठा ओबीसी हा वाद कधीच होणार नाही
राज्यात मराठा ओबीसी हा वाद कधीच होणार नाही. छगन भुजबळ हे महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत. छगन भुजबळांना सरकारनं बळ दिलं आहे. त्यांना सरकामध्ये घेऊन मंत्रीपद दिलं आहे. त्या पदाचा गैरवापर करत आहेत. ओबीसीचे सगळे नेते माझ्या विरोधात उभं करण्याचं काम छगन भुजबळ यांनी केल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मी माझा समाज एका बाजुला आहे. सगळे ओबीसीचे नेते एका बाजुला आहे. नेते राजकीय स्वार्थासाठी काम करत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: