एक्स्प्लोर

Maratha Reservation : 'माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या'; मनोज जरांगेंचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान

सलाईनमधून मला विष देण्याचा डाव आहे. म्हणून मी सलाईन घेणं बंद केलं आहे, असा आरोप करत माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, असं खुलं आव्हान मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. 

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : सलाईनमधून मला विष देण्याचा डाव आहे. म्हणून मी सलाईन घेणं बंद केलं आहे, असा आरोप करत माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, असं खुलं आव्हान मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिले आहे. 

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी आज निर्णायक बैठक घेतली आहे. यानंतर त्यांनी समाजाला संबोधित केले. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांचा दरारा संपवायचा आहे. एकनाथ शिंदेचे माणसे आणि अजित दादांचे देखील दोन आमदार आहेत. त्याचा काही तरी गेम करावा लागेल किंवा याचे एन्काऊंटर करावे लागेल, असे देवेंद्र फडणवीसांचे षडयंत्र आहे. तुला माझा बळी पाहिजे तर मी सागर बंगल्यावर येतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

बारस्कर हा फडणवीसांनीच उभा केलाय

ते पुढे म्हणाले की, बारस्कर हा फडणवीस यांनीच उभा केलाय. मीडियावर दबाव टाकला जात आहे. हे फक्त देवेंद्र फडणवीस यांचे काम आहे. गुलाल उधळला नाही, त्यामुळे यांचा अपमान आहे. त्याच्या डोक्यात मी ब्राम्हण त्या मराठ्यांना हरवुन दाखवू, असे आहे. ज्याचे ऐकले नाही त्याला संपवतो. देवेंद्र फडणवीस म्हटले तर नारायण राणे काही करू शकत नाहीत. एकनाथ शिंदेला काहीच करू देत नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. 

मी कोणत्याही पक्षाचा नाही

छत्रपतींशी शपथ घेऊन सांगतो मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही. मराठ्यांना संपवण्याचा कुणाचा तरी डाव आहे. यात देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे हे मी इथे स्पष्ट सांगतो. मराठ्यांना-मराठ्यांच्या हातूनच हरवण्याचा त्यांचा डाव आहे, असा गंभीर आरोप जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर केला आहे.

...तर फडणवीसांना आयुष्यातून उठवणार

माझ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रारी शोधल्या जात आहेत. संपूर्ण राज्यात माझ्या विरोधात छेडछाड, विनयभंगबाबत एकही तक्रार असल्यास जे सांगाल ते करायला तयार आहे. एखाद्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात तुम्ही हात घालू शकत नाही. फडणवीस तू माझा बळी घेणार असेल तर उपोषण करून मरण्यापेक्षा तुझ्या दारात मरतो. तू गनिमा कावा करत असशील तर तुला आयुष्यातून उठवणार असे जरांगे म्हणाले. 

आणखी वाचा 

'सर्व एकटा देवेंद्र फडणवीस करतोय'; मनोज जरांगेंचा पहिल्यांदाच थेट आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mission Ayodhya Movie: राममंदिराचं स्वप्न पूर्ण, रामराज्याचं काय?‘मिशन अयोध्या’ची टीम ‘माझा’वरRajkiya Sholay MVA Uddhav Thackeray Special Report : चर्चेत ठाकरेंचं स्वबळ, मविआत वादाची कळ?Rajkiya Shole | Mahadev Munde Special Report : नवा व्हिडीओ, 'त्या' हत्या आणि वाल्मिक कराडचं कनेक्शन काय?Zero Hour | Fatafat World | जगात कुठे काय घडतंय? पाहुयात  झिरो आवरमध्ये 'फटाफट' बातम्या 24 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Embed widget