एक्स्प्लोर

मतांसाठी राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवू नका, मनोज जरांगे पाटलांचं फडणवीसांना आवाहन 

मतांसाठी राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडू नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे.

Manoj Jarange Patil : ओबीसी (OBC) आणि मराठ्यांच्या (Maratha) मतांसाठी राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवू नका. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळावी असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलं आहे. ते बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

मतांच्या राजकारणासाठी राज्याची कायदा व्यवस्था बिघडवू नका

ओबीसीचे मते आणि मराठ्यांचे मते हे या सरकारला पाहिजेत म्हणून ओबीसी आंदोलन आमच्या बरोबरीने आणून बसवलं आहे. त्यानंतर रोज ज्या घडामोडी घडत आहेत त्यात पोलीस त्यांचं काम करतायेत. मात्र, केवळ मतांच्या राजकारणासाठी राज्याची कायदा व्यवस्था बिघडू देऊ नका असे आवाहन मनोज जरांगे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले.

मी समाजासाठी काम करतोय, समाजावर अन्याय होऊ नये 

मी समाजासाठी काम करत आहे. मला सगळा समाज सारखा असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. माझ्या समाजावर अन्याय झाला न पाहिजे ही आमची भूमिका असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. आमच्या गोरगरिब मराठ्यांवर अन्याय करु नका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करु नका असे आवाहन जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलं. आमचा संयम ढळू देऊ नका. 

छगन भुजबळ यांनी काही लोक काड्या लावण्यासाठी ठेवलेत

विनायक मेटे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात स्मारक व्हावे हे विनायक मेटे यांचे स्वप्न होते, त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. पण राजकारणी लोकांना महापुरुष मतांपुरतेच हवे असतात असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, छगन भुजबळ यांनी काही लोक काड्या लावण्यासाठी ठेवल्याचे जरांगे पाटील म्हणाले. आम्ही त्यांना दोष देत नाही, कारण सगळ्या गोष्टीचे मुकादम हे भुजबळ असल्याचे जरांगे म्हणाले. ओबीसी आणि मराठा बांधवांचे भुजबळ वाटोळ करत असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.

माझ्या गोरगरीब मराठ्यांवर अन्याय होऊ देऊ नका असे मी देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मराठ्यांचा संयम ढळू देऊ नका असेही जरांगे पाटील म्हणाले. बीडचा पालकमंत्री तुमचा म्हणून मराठ्यांवर अन्याय करता का? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला. 

महत्वाच्या बातम्या:

मातोरीत छगन भुजबळांनी दगडफेक करायला सांगितली असेल, त्यांना राज्यात दंगली घडवायच्यात:  मनोज जरांगे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget