![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मोठी बातमी! मनोज जरांगेंचा मोर्चा मुंबईत दाखल होण्यापूर्वीच पोलिसांचा मोठा निर्णय; महामार्गावरून जाण्याची...
Manoj Jarange : जलद कृती दल आणि बॉम्ब निकामी पथकही तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे, मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून परवानगी दिली जाणार नसल्याची चर्चा आहे.
![मोठी बातमी! मनोज जरांगेंचा मोर्चा मुंबईत दाखल होण्यापूर्वीच पोलिसांचा मोठा निर्णय; महामार्गावरून जाण्याची... Manoj Jarange Mumbai Rally Police Security increased on Mumbai Pune Expressway Maratha Reservation Rally Pune marathi news मोठी बातमी! मनोज जरांगेंचा मोर्चा मुंबईत दाखल होण्यापूर्वीच पोलिसांचा मोठा निर्णय; महामार्गावरून जाण्याची...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/25/998e07f53ad1503207cc796fd658e0c01706163769876737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Manoj Jarange Mumbai Rally : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे (Manoj Jarange) लोणावळा येथे पोहचले आहेत. त्यानंतर जरांगे हे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करत मुंबई गाठणार आहेत. मात्र, जरांगे यांची रॅली मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोहचण्यापूर्वीच पोलिसांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कारण, लोणावळा येथे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या दोन्ही मार्गांवर पोलिसांची कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. जलद कृती दल आणि बॉम्ब निकामी पथकही तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे, मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून परवानगी दिली जाणार नसल्याची चर्चा आहे.
मनोज जरांगे यांच्या मुंबईकडे जाणाऱ्या मराठा आरक्षण रॅलीनुसार मराठा आरक्षण समर्थकांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जायचे आहे. परंतु, पोलिसांनी त्यांना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे, नवीन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे आता जरांगे यांची आरक्षण रॅली कोणत्या मार्गाने जाणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
#WATCH | Maharashtra | Heavy security deployed at both entry and exit points of Mumbai-Pune Expressway at Lonavala. Rapid Action Force and bomb disposal squad also stationed.
— ANI (@ANI) January 25, 2024
Maratha reservation supporters wanted to go towards Mumbai via Mumbai-Pune Expressway but the Police… pic.twitter.com/9Y9VeXJKTN
सरकारच शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला...
मनोज जरांगे यांची पायी दिंडी पुण्यात पोहचली असून, आज मध्यरात्री मुंबईच्या वेशीवर जाऊन हा मोर्चा धडकणार आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड हे जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी लोणावळा येथे पोहचले आहेत. एका बंद खोलीत विभागीय आयुक्त आणि जरांगे यांच्यात चर्चा होत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील जरांगे यांच्यासोबत फोनवरून चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीतून काही तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
पुण्यात मार्ग बदलावा लागला...
मनोज जरांगे यांची पायी दिंडी पुण्यात आल्यावर नियोजित मार्गावर काही रुग्णालय असल्याने पोलिसांनी त्यांना मार्ग बदलण्याची विनंती केली होती. त्यामुळे जरांगे यांनी देखील पोलिसांच्या विनंतीला मान देत मार्ग बदलला होता.
इतर महत्वाच्या बातम्या:
सावळा गोंधळ! पहिली पास व्यक्ती करतोय आरक्षणाचा सर्वेक्षण; मराठा समाजात तीव्र संताप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)