(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मविआ'च्या विरोधात मराठा उमेदवार नको; जरांगेंची महाविकास आघाडीसोबत डील; अजय बारस्करांचा आरोप
Ajay Baraskar : मनोज जारांगे यांची लढाई गोरगरीब मराठ्यांसाठी आणि लेकरांसाठी नव्हती. ज्यांना ओबीसीच्या कोट्यातून सरपंच व्हायच होतं, त्यांच्यासाठी जरांगे यांची ही लढाई होती.
मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर अजय बारस्कर (Ajay Baraskar) यांनी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. आंतरवाली सराटीत (Antarwali Sarathi) झालेल्या बैठकीत प्रत्येक मतदारसंघात एक मराठा उमेदवार (Maratha Candidate) अपक्ष उभा करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, यासाठी मनोज जरांगे यांची महाविकास आघाडीसोबत (Maha Vikas Aghadi) मोठी डील झाली असल्याचा आरोप अजय बारस्करांनी केला आहे. तसेच, महाविकास आघाडीचा उमेदवार अडचणीत येईल अशा ठिकाणी मराठा उमेदवार उभं करू नयेत अशी देखील डील झाल्याचा आरोप बारस्करांनी केला आहे. बारस्करांनी आज मुंबईत बोलवलेल्या पत्रकार परिषदेत हे आरोप केले आहे.
यावेळी बोलतांना अजय बारस्कर म्हणाले की, “ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावली गेली. एकच मराठा अपक्ष उमेदवार उभा करण्याची पहिली डील झाली होती. आता मविआसोबत दुसरी डील सूरु आहे. मविआचा उमेदवार असेल तिथे उमेदवार उभा करणार नाही अशी दुसरी डील सुरू आहे. यांच्या आंदोलनाचा चार दोन लोकांना फायदा झाला आहे. आरक्षणाचा लढा हा आता राजकीय लढा झाला," असल्याचे बारस्कर म्हणाले.
अशोक चव्हाणांच्या भेटीचे रेकॉर्डिंग समोर आणा....
काही दिवसांपूर्वी रात्री अशोक चव्हाण मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले होते. तसेच त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली. दरम्यान मनोज जरांगे म्हणाले होते की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत पहिल्यांदा चर्चा केली. यावेळी त्यांची रेकॉर्डिंग देखील केली आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण यांच्या भेटीवेळी काय चर्चा झाली? त्याचं रेकॉर्डिंग देखील जगासमोर आणले पाहिजे. मनोज जारांगे यांची लढाई गोरगरीब मराठ्यांसाठी आणि लेकरांसाठी नव्हती. ज्यांना ओबीसीच्या कोट्यातून सरपंच व्हायच होतं, त्यांच्यासाठी जरांगे यांची ही लढाई होती. त्याने जे काही सुरु केलं त्यानंतर मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले, असल्याचे बारस्कर म्हणाले.
'त्या' महिलेने तिसऱ्या दिवशी नवी कोरी गाडी घेतली
वाशीमध्ये ज्यादिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडले, त्याच्या आदल्या दिवशी जरांगे यांनी मटण खाल्ले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या घरी ज्यावेळी यायला निघालात त्यावेळी तुम्ही रात्री जेवण केलात. ज्यांच्या हाताने तुम्ही उपोषण सोडलं त्या महिलेने तिसऱ्या दिवशी नवी कोरी गाडी घेतली. कुठून आले पैसे? असा प्रश्न बारस्कर यांनी उपस्थित केला.
जरांगे अशोक चव्हाण यांना शरण गेले
तुम्ही आता फडणवीस साहेब, फडणवीस साहेब म्हणायला लागले. एसआयटी चौकशीला घाबरलात म्हणून तुम्ही अशोक चव्हाण यांना शरण गेले. तिकडे अरविंद केजरीवाल चौकशीला घाबरले नाहीत, तुम्ही कशाला घाबरताय. हा दहावी बारावी छाप, पास झाला की नापास माहित नाही. पण याने कसलही ज्ञान नसताना सगळ्यांना भरकटवल. लोकसभेत आपलं काही गुतल नाही, आरक्षण जे मिळणार आहे ते राज्यात मिळणार आहे अस ते म्हणाले. खरच अस आहे का? असा सवालही बारस्कर यांनी उपस्थित केला.
इतर महत्वाच्या बातम्या :