एक्स्प्लोर

Home Loan : 25 वर्षांच्या गृहकर्जाची परतफेड 10 वर्षात कशी करायची?  35-40 लाखांचं व्याज कसं वाचवायचं? 2 पर्याय फायदेशीर ठरणार

Home Loan : भारतात अनेक जण घर खरेदी करत असताना बँकांकडून गृह कर्ज घेत असतात. मात्र, गृह कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा अनेकांसाठी चिंतेचा विषय असतो. 

मुंबई : आपलं स्वत:च्या मालकीचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. घर खरेदीसाठी अनेक जण बँका किंवा वित्तीय संस्थांकडून गृह कर्ज घेत असतात.गृह कर्ज घेतल्यानंतर सुरुवातीच्या काळात ईएमआय भरत असताना व्याज मोठ्या प्रमाणात भरावं लागतं, तर, मुद्दल रक्कम कमी प्रमाणात कर्ज खात्यात जमा होते. सुरुवातीच्या कालावधीत  अनेक जणांना गृहकर्जाचं मुद्दल का कमी होत नाही असा प्रश्न पडू शकतो. सुरुवातीच्या काळात ईएमआयमधील जवळपास  90 टक्के रक्कम व्याजात जाते तर 10 टक्के रक्कम मुद्दल म्हणून जमा होते आणि कर्जाची रक्कम कमी होते. जर 25 वर्षांचं गृहकर्ज घेतलं असेल तर ते 10 वर्षात कसं फेडावं यासंदर्भातील माहिती जाणून घेणार  आहोत.  

समजा एखाद्या व्यक्तीनं  50 लाखांचं गृहकर्ज  25 वर्षांच्या कालावधीसाठी 8.5 टक्के व्याजानं घेतलं तर त्याला मासिक हप्ता 40000 रुपये भरावं लागेल. म्हणजेच पहिल्या वर्षात संबंधित व्यक्ती 480000 रुपये गृहकर्जासाठी ईएमआयद्वारे भरेल, त्यापैकी 60000 हजार रुपये मुद्दल म्हणून कर्जाच्या रकमेतून कमी होईल, तर 4.2 लाख रुपये व्याज बँकेला मिळेल. 

10 वर्षात गृह कर्जाची परतफेड कशी करायची?

मान्यताप्राप्त वित्तीय सल्लागार विजय महेश्वरी यांनी 25 लाख रुपयांचं गृहकर्ज 10 वर्षांमध्ये कसं फेडायचं  आणि लाखो रुपयांचं व्याज कसं वाचवायचं याबाबत माहिती दिली. जर, तुमचा ईएमआय 40000 रुपये असेल तर प्रत्येक वर्षात एक अतिरिक्त ईएमआय भरा, यामुळं मुद्दल रक्कम कमी होईल. या नुसार गृहकर्जाचा कालावधी 25 वर्षांवरुन 20 वर्षांवर येईल. 

ईएमआयची रक्कम वाढवा

समजा संबंधित व्यक्तीचा गृहकर्जाचा ईएमआय 40 हजार रुपयांवरुन 7.5 टक्के वाढवून 43000 रुपये केल्यास, त्याच्या पुढील वर्षी 46200  ईएमआय वाढवल्यास, म्हणजेच दरवर्षी 7.5 टक्के ईएमआय वाढवल्यास गृह कर्ज 12 वर्षा त संपू शकते.

दोन्ही पर्यायांचा वापर केल्यास म्हणजेच दरवर्षी एक अतिरिक्त ईएमआय भरला आणि  ईएमआयमध्ये 7.5 टक्क्यांची वाढ केल्यास 25 वर्षांचं गृहकर्ज 10 वर्षात संपू शकते. या पर्यायाद्वारे 35 ते 40 लाख रुपयांची बचत होऊ शकते.  

समजा एखाद्या व्यक्तीनं 50 लाखांचं गृहकर्ज घेतलं असेल आणि त्याचा व्याजदर 8.5 टक्के आणि ईएमआय 40000 असेल  तर कोणताही ईएमआय न वाढवल्यास 2049 पर्यंत 1.2 कोटी रुपये भरावे लागतील. म्हणजेच 70 लाख रुपये व्याज जाऊ शकतं. गृहकर्ज परतफेडीचे दोन्ही पर्याय वापरल्यास परतफेडीचा कालावधी 25 वर्षांऐवजी 10 वर्ष होईल. या कर्जाची परतफेड मुद्दल 50 लाख रुपये आणि व्याज 35 लाख अशी  85 लाख रुपये परतफेड होईल तर 35 ते 40 लाखांची बचत होऊ शकते. 

 जर तुम्ही देखील गृहकर्ज घेत असाल तर 20-25 वर्षांपर्यंत ईएमआय भरु नका, पगार जसा वाढेल त्या प्रमाणं  एक अतिरिक्त ईएमआय भरा. दोन्ही पर्यायांचा वापर  करुन 10 वर्षात कर्ज मुक्त होऊ शकता. 

महत्त्वाच्या बातम्या

FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget