एक्स्प्लोर

मोठी बातमी! अजय बारसकरांना स्वतःच्या गावातूनच विरोध, गावकऱ्यांनी केला निषेध; मनोज जरांगेंना दिलं समर्थन

Ajay Maharaj Baraskar : अहमदनगरच्या (Ahmednagar) सावेडी ग्रामस्थांच्या वतीने अजय बारसकर यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. 

अहमदनगर : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर मागील काही दिवसांपासून अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar)  यांच्याकडून आरोप होत आहे. सोमवारी देखील बारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. असे असतानाच मनोज जरांगे यांच्या विरोधात बोलणारे अजय बारसकर यांना त्यांच्याच गावातून विरोध होतांना पाहायला मिळत आहे. अहमदनगरच्या (Ahmednagar) सावेडी ग्रामस्थांच्या वतीने अजय बारसकर यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. 

मनोज जरांगे यांचे कधीकाळचे सहकारी असलेल्या महाराज बारसकर यांनी अचानक जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेतली. मनोज जरांगे यांचे आंतरवाली आमरण उपोषण सुरु असतानाच बारसकर यांच्याकडून त्यांना पाणी पिण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, जरांगे यांनी बारसकरांना व्यासपीठाच्या खाली व्हा असे सांगून तेथून काढून दिले. त्यानंतर बारसकरांनी जरांगे यांच्याविरोधात भूमिका घेतली. मागील काही दिवसांत सतत पत्रकार परिषदेतून त्यांनी जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. मात्र, जरांगे यांच्यावर आरोप करणाऱ्या बारसकरांना त्यांच्या मुळगाव सावेडी विरोध होतांना पाहायला मिळत आहे. बारसकरांनी जरांगे यांच्याविरोधात भूमिका घेतल्याने हा विरोध होत आहे. 

गावकऱ्यांनी घेतला विरोधाचा ठराव...

अहमदनगर जिल्ह्यातील सावेडी हे अजय महाराज बारसकरांचे मूळ गाव आहे. मात्र, त्यांच्या याच मूळगावातून त्यांना विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्याची सावेडी येथील गावकऱ्यांनी भूमिका घेतली आहे. गावकऱ्यांनी बारसकरांचा निषेध देखील केला आहे. तसेच, बारसकरांची भूमिका त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. त्यांच्या याच भूमिकेला सावेडी गावचा विरोध असल्याचा दावा देखील गावकरी करत आहेत. विशेष म्हणजे सावेडी येथील गावकऱ्यांनी ठराव घेत अजय महाराज बारसकरांचा निषेध केला आहे. सावेडीच्या विठ्ठल रुक्मणी मंदिरात हा ठराव घेण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. 

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठींबा...

सावेडी येथील गावकऱ्यांनी ठराव घेत अजय महाराज बारसकरांचा निषेध असतानाच दुसरीकडे मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठींबा देखील दिला आहे. मागील पाच ते सहा महिन्यापासून सुरु असलेल्या जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. आम्ही स्वतः त्यांच्या आंदोलनात सहभागी नसलो तरी आम्ही त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांच्या भूमिकेला देखील आमचे समर्थन असल्याचं गावकऱ्यांनी म्हटले आहेत. विशेष म्हणजे बारसकरांच्या भुमिकेशी सावेडी गावाचा कोणताही संबध नसल्याचे देखील गावकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Ajay Maharaj Baraskar vs Manoj Jarange : कालचा प्रकार म्हणजे 'तमाशा'; अजय बारसकरांचा पुन्हा मनोज जरांगेंवर हल्लाबोल

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Fadnavis and Manoj Jarange Patil: आधी घरी जेवणाचं निमंत्रण, आता अमृता फडणवीस जरांगेंबाबत म्हणाल्या, 'माझा भाऊ जे करेल ते....'
आधी घरी जेवणाचं निमंत्रण, आता अमृता फडणवीस जरांगेंबाबत म्हणाल्या, 'माझा भाऊ जे करेल ते....'
Amol Khatal: जिवंतपणी श्रद्धांजलीची पोस्ट व्हायरल, आमदार अमोल खताळ संतापले; म्हणाले, 'आता मी शांत बसणार नाही...'
जिवंतपणी श्रद्धांजलीची पोस्ट व्हायरल, आमदार अमोल खताळ संतापले; म्हणाले, 'आता मी शांत बसणार नाही...'
Dharmveer Gad : 'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
Sujay Vikhe Patil on DJ: आमच्या ग्रामीण भागात इमारती नसल्याने डीजेचा त्रास होत नाही, आवाज कुठे निघून जातो कळत नाही: सुजय विखे पाटील
आमच्या ग्रामीण भागात इमारती नसल्याने डीजेचा त्रास होत नाही, आवाज कुठे निघून जातो कळत नाही: सुजय विखे पाटील

व्हिडीओ

Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar Post:
"दादांची रांगोळी पाहिली अन् मन थांबलं..."; अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार पुन्हा भावूक, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Chhatrapati Sambhajinagar : गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
Ganesh Chaturthi 2026 : गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वे 386 विशेष रेल्वे गाड्या चालवणार, मुंबईत मेट्रोची मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरु राहणार, कोकणात जाणारी वाहनं खालापूरमार्गे वळवली 
गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वे 386 विशेष रेल्वे गाड्या चालवणार, मुंबईत मेट्रोची मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरु राहणार
Mumbai Rain BMC: आधीच मुंबईत धो-धो पाऊस, त्यात मुंबई महानगरपालिकेने अचानक 'हे' चार रेल्वे पूल बंद केले, दोन दिवस महत्त्वाचा अलर्ट
आधीच मुंबईत धो-धो पाऊस, त्यात मुंबई महानगरपालिकेने अचानक 'हे' चार रेल्वे पूल बंद केले, दोन दिवस महत्त्वाचा अलर्ट
Nagpur Crime News: मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने सूनेला डोक्यात कुऱ्हाड टाकून संपवलं, नंतर स्वत: विहिरीत... नागपूरमधील धक्कादायक घटना
मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने सूनेला डोक्यात कुऱ्हाड टाकून संपवलं, नंतर स्वत: विहिरीत... नागपूरमधील धक्कादायक घटना
Sanjay Gaikwad: 'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Embed widget