एक्स्प्लोर
रंगलेल्या बर्थ डे पार्टीत थरार, बायको आणि तिच्या मित्रावर गोळीबार!
![रंगलेल्या बर्थ डे पार्टीत थरार, बायको आणि तिच्या मित्रावर गोळीबार! Man Fires Shots At Wife And Her Boyfriend In Nashik रंगलेल्या बर्थ डे पार्टीत थरार, बायको आणि तिच्या मित्रावर गोळीबार!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/19054116/nashik-firing-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक: नाशिकमध्ये वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. नवऱ्याने बायकोवर आणि तिच्या मित्रावर गोळीबार केल्याची घटना, काल रात्री पाथर्डी फाट्याजवळ म्हाडा कॉलनीत घडली.
दीपक परदेशी असं आरोपीचं नाव असून, कोमल परदेशी आणि नागेश्वर ठाकूर असं गोळीबारात जखमी झालेल्यांची नावं आहेत. काल रात्री 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
काय आहे प्रकरण?
साई रो हाऊसमध्ये दीपक परदेशीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्टी ऐन रंगात आली असतानाच, वादावादीला सुरुवात झाली. या वादाचं रुपांतर गोळीबारात झालं. दीपकने त्याची बायको कोमल आणि तिचा मित्र नागेश्वर ठाकूरवर गोळ्या झाडल्या. यामध्ये ते दोघेही जखमी झाले.
गोळीबारानंतर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आरोपीलाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
शिक्षण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)