एक्स्प्लोर
एफेड्रिन ड्रग प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या नवऱ्याचं नाव

ठाणे : ठाणे पोलिसांनी पकडलेल्या दोन हजार कोटींच्या एफेड्रिन ड्रग प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. गुजरातच्या माजी आमदाराच्या मुलाचं नाव समोर आल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक नाव समोर आलं आहे. ते नाव म्हणजे अभिनेत्री ममता कुलकर्णीचा पती विकी गोस्वामी होय. विकी सध्या केनियात असल्याचं समजतंय. ठाणे पोलिसांनी 16 एप्रिलला तब्बल 18 टन वजनाचं सुमारे 2 हजार कोटी रुपयांचं एफेड्रिन ड्रग जप्त केलं होतं. इतका मोठा साठा सापडल्याने देशभरात खळबळ उडाली होती. या ड्रगप्रकरणाचं कनेक्शन सोलापूरपासून आता परदेशापर्यंत पोहोचलं आहे. हे ड्रग सोलापूरच्या एव्हॉन ऑरगॅनिक कंपनीत तयार झाल्याचं उघड झालं. यानंतर या कंपनीच्या अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर आता नवनवी नावं समोर येत आहेत. विकी गोस्वामी हे जगभरातील ड्रग्ज रॅकेट चालकांपैकी एक मोठं नाव आहे. विकीला 2014 साली केनियात अटक झाली होती, त्याच वेळी त्याचं चर्चेत आलं होतं. विकीला 13 नोव्हेंबर 2014 रोजी डॅग्ज रॅकेट चालवण्याच्या आरोपावरून अटक झाली होती. विकी गोस्वामी नेहमीच अमेरिकेच्या 'ड्रग्स एनफोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशन' अर्थात (DEA) च्या निशाण्यावर होता. महत्त्वाचं म्हणजे DEA ची सोलापूरच्या एव्हॉन ऑरगॅनिक कंपनीवरही लक्ष होतं. याप्रकरणात ठाणे पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. पुनीत श्रृंगी, मनोज जैन, आणि हरदीप गिल यांना नुकत्याच बेड्या ठोकल्या आहेत. तर मनोज आणि फरार आरोपी किशोर राठोड हे विकी गोस्वामीसोबत ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे. गुजरातचा विकी, ममता कुलकर्णीशी लग्न विकी गोस्वामी मूळचा गुजरातचा आहे. त्याचे वडिल पोलिसात होते. विकीला पायलट बनायचं होतं. मात्र लहानपणापासूनच तो वाईट व्यक्तींच्या नादाला लागला आणि भरकटून ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकला. दुबईत अटक विकीला 1997 मध्ये दुबईतही डॅग्ज रॅकेट प्रकरणात अटक झाली होती. त्यावेळी त्याला जन्मठेपेची (25 वर्ष) शिक्षा झाली होती. जेलमध्येच त्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता. तर त्याच काळात विकीचं ममता कुलकर्णीशी लग्न झालं. जेलमधील चांगल्या वर्तणुकीमुळे विकीला दुबई जेलमधून सोडण्यात आलं. त्यानंतर 2012 मध्ये विकी आणि ममता भारतात आले. इथून त्याने आफ्रिकी देशात पुन्हा ड्रग तस्करी संदर्भात चाचपणी सुरु केली. ममता कुलकर्णी विकीचा रियल इस्टेट आणि हॉटेल व्यवसाय सांभाळते असं सांगण्यात येतं. सध्या विकी ठाणे पोलिसांच्या रडारवर आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. 12 एप्रिलला एका नायजेरियन व्यक्तीला ड्रग्ज तस्करीप्रकरणात अटक केल्यानंतर हा मोठा गौप्यस्फोट समोर आला. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. मात्र आणखी मोठे मासे अजून गळाला लागण्याची शक्यता आहे. ड्रग्ज प्रकरणाचे सोलापूरशी धागेदोरे मिळाल्यानंतर पोलिसांनी धानेश्वर राजाराम स्वामीला अटक केली. चौकशीतून राजेंद्र डीमरी नावाच्या व्यक्तीचं नाव समोर आलं. पोलिसांनी पुण्यातून स्वामीला अटक केली. त्याच्याकडे साडेपाच किलो इफेड्रीन सापडलं. त्यानंतर पोलीस सोलापुरातील त्या फॅक्टरीपर्यंत पोहोचले. अव्होन ऑर्गनिक्स, अव्होन मेडिसायन्सेस आणि अव्होन लाईफ सायन्सेस अशा वेगवेगळ्या नावाने कार्यरत असलेल्या सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतली एक वादग्रस्त कंपनी. सुरुवातीपासूनच या कंपनीतल्या उत्पादनावर संशयाने पाहिलं जायचं. अखेर १५ एप्रिल २०१६ रोजी ठाणे आणि अहमदाबाद पोलिसांनी मारलेल्या छाप्यात या कंपनीच खरं रूप समोर आलं. औषध निर्मितीच्या नावाखाली अमली पदार्थ बनवले जात असल्याच उघड झालं. तब्बल दोन हजार कोटींचा अमली पदार्थाचा साठा इथं सापडला. सुरुवातीला धानेश्वर स्वामी आणि राजेंद्र डिमरी या दोन आरोपींना जेरबंद केलं. त्यांच्यापासून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सोलापूरच्या अव्होनपर्यंत येऊन पोहोचला. पण सोलापूर ते युरोप व्हाया गुजरात अशी होणारी अमली पदार्थांची तस्करी यानिमित्ताने उघडकीस आली. ठाणे अमली पदार्थ विरोधी पथक आणि अहमदाबाद एटीएसच पथक अव्होनच्या कारभाराची चौकशी करतंय. इफेड्रीनचा आणखी साठा कंपनीत असावा असा संशय तपास पथकाला आहे. तो शोधण्यासाठी प्रयत्न चालले आहेत. पोलिसांनी 571 किलो इफेड्रीन आणि 8541 किलो सूडो इफेड्रीन ड्रग जप्त केलं. या दोन्ही ड्रग्जचा वापर कोकीन सारखं ड्रग बनवण्यासाठी वापर केला जातो. त्यामुळं या प्रकरणातले मास्टरमाईंड पोलिसांच्या गळाला कधी लागणार याकडं सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
संबंंधित बातम्या
ठाणे इफेड्रीन ड्रगप्रकरणात माजी आमदाराचा मुलगा?
18 टन, 2 हजार कोटींचं एफेड्रिन ड्रग्ज जप्त
सोलापुरात 200 कोटींचं एफिड्रिन ड्रग जप्त
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























