एक्स्प्लोर
Advertisement
भय्यूजी महाराजांनी मला फसवलं, महिलेचे गंभीर आरोप
मुंबई : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले. डॉ. आयुषी यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. मात्र त्यांच्या लग्नाच्या दिवशीच त्यांच्यावर काही गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.
भय्यू महाराज हे अत्यंत भोंदू महाराज असून, त्यांनी फसवणूक केल्याचा दावा करणारी पोस्ट एका महिलेने केली आहे. मल्लिका राजपूत असं या महिलेचं नाव आहे.
मल्लिका राजपूत यांची पोस्ट
‘’भय्यूजी महाराज यांनी माझ्याकडून चरित्र लेखन करुन घेतलं.
कित्येक महिने मी अभ्यास करुन ते पुस्तक पूर्ण केलं.
या पुस्तकाच्या 950 प्रती दोन ते अडीच वर्षांपासून भय्यू महाराजांकडे आहेत.
त्या प्रती ते मला परतही देत नाहीत आणि प्रकाशीतही करत नाहीत.
मला फसवून आता वेगवेगळ्या नंबरवरुन माझ्याशी बोलत आहेत.
भय्यूजी महराजांवर कुणीही विश्वास ठेवू नका.
पुस्तकासाठी भय्यू महाराजांना मी कोर्टाची नोटीस पाठवणार आहे.’’, असं मल्लिका यांनी म्हटलं आहे.
भय्यूजी महाराजांचं स्पष्टीकरण मल्लीका हे आरोप फक्त प्रसिद्धीच्या हव्यासापोटी करत असल्याचा दावा भय्यूजी महाराज यांनी केला आहे. चरित्रामध्ये मल्लिकाने अनेक काल्पनिक गोष्टींचा समावेश केल्याने आपण हे पुस्तक प्रकाशित केलं नसल्याचं स्पष्टीकरण भय्यूजी महाराजांनी दिलं. लेखनाच्या निमित्ताने मल्लिका मला भेटली होती, माझ्या कुटुंबियांना ती ओळखत होती, पण तिचे लिखाण पाहून आपण काम थांबवल्याचा दावाही भय्यूजी महाराज यांनी केला. फेसबुकवरून आपली बदनामी करणाऱ्या मल्लिकावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा भय्यूजी महाराज यांनी दिला आहे. मल्लिका राजपूत ही उत्तर प्रदेशच्या भाजपची कार्यकर्ता असून, विधानसभेच्या तिकीटासाठी ती इच्छूक होती.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement