एक्स्प्लोर

DKTE Ichalkaranji : डीकेटीईच्या विद्यार्थ्यांकडून दिपावलीसाठी सौरऊर्जेवरील मातीचे दिवे, रांगोळी, तोरण निर्मिती

DKTE Ichalkaranji : डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक सौरऊर्जेवर चालणारे तोरण, रांगोळी व मातीचे दिवे तयार केले आहेत. फक्त सौरऊर्जेवर चालत असल्याने विजेची व घरगुती साहित्यांची बचत होणार आहे.

DKTE Ichalkaranji : वर्षातील मोठा सण म्हणून दिवाळी हा सण सर्वत्र आनंदाने साजरा केला जातो, दिवाळी म्हणजे दिव्यांची आरस, विद्युत रोषणाई, त्याचबरोबर घराची शोभा वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या कलाकृतीचे मातीचे दिवे, आकाशदीवे, तोरण लावले जातात. प्रत्येकाचे घर उजळते ते दिव्यामुळे व दिवाळी सणाचा अकर्षण म्हणजे अंगणात पणती लावून सुबक रांगोळी काढून सजावट व दाराचे तोरण. सध्या रंगीत रांगोळी या पारंपारिकरित्या अंगणात काढल्या जातात व तोरण हे प्लॅस्टीकचे व चीनी कंपनीची बाजारात आली आहेत या सर्वांवर उपाय म्हणून डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक व नैसर्गिक स्त्रोताचा वापर करीत सौरऊर्जेवर चालणारे तोरण, रांगोळी व मातीचे दिवे तयार केले आहेत.

डीकेटीईमधील एआयसीटीई आयडिया लॅबमधील विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवरील मातीचे दिवे, रांगोळी व दारावरचे तोरण ‘सोलारवाली दिवाळी’ या उपक्रमांतर्गत सौरऊर्जेवरील साहित्य बनविले आहे. रांगोळी ही हुबेहुब पारंपारिक रांगोळीसारखे दिसते आणि तोरण हे इकोफ्रेंडली साहित्यांचा वापर केला आहे. या दिव्यांना तेलवात वैगरे काहीही लागत नाही, फक्त सौरऊर्जेवर चालत असल्याने विजेची व घरगुती साहीत्यांची व वेळेची बचत होणार आहे.

डीकेटीईमध्ये बनविलेले रांगोळी, दाराचे तोरण व मातीचे दिवे हे नैसर्गिक स्त्रोत्रावर म्हणजे सौरउर्जेवरील असल्यामुळे रांगोळी चा ट्रे, तोरण व मातीचे दिवे हे 8 तास सौर उर्जेमध्ये चार्जिंग केल्यास 2 ते 3 दिवस स्वंयचलित प्रज्वलित होतात, यामुळे सर्वसामन्यांची विजेची बचत होणार आहे. सर्व साहित्य हे पूर्णपणे पारंपरिक असून स्वदेशी बनावटीच्या साहित्यापासून बनविलेले असून सर्व सामन्यांना परवडेल अशा कमी किमतीत व दिसायला सुबक बनविलेले आहेत. मागीलवर्षी दिवाळीसाठी देखील विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवरील आकाशकंदील तयार केल्या होत्या ते अकाशकंदील आजही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

सौरउर्जेवरील अनोखी रांगोळी ही मोठमोठ्या कंपन्यामध्ये, मॉलमध्ये, लग्नसमारंभाच्या हॉलमध्ये जिथे वर्षभर रांगोळी हवी असते अशा ठिकाणी सौरउर्जेवरील ही अप्रतिम रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. यामुळे भारतीय संस्कृती जपण्याचे भाग्य देखील मिळेल, तर अशी ही सौरउर्जेवरील रांगोळी सर्व महिलांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.

साबीर सनदे, प्रथमेश सरबाळी, अभिषेक माहिते, प्रणव चौगुले, वरद गोरे, प्राजक्ता भोसले, अर्पिता चौगुले, ऐश्‍वर्या गौराजे, पियुष आळतेकर, पृथ्वीराज चव्हाण, हर्ष कोळी, अभिनंदन पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे,आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे संचालक डॉ राहुल आवाडे, खजिनदार प्रकाश दत्तवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी विद्यार्थ्यांस शुभेच्छा दिल्या. सौरउर्जेवरील सर्व साहीत्य तयार करण्यासाठी प्र.संचालिक प्रा. डॉ सौ. एल.एस.आडमुठे, उपसंचालक प्रा डॉ यु.जे. पाटील, प्रा.डॉ आर.एन.पाटील, प्रा.व्ही.डी. शिंदे व प्राध्यपकांचे मार्गदर्शन लाभले.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget