एक्स्प्लोर

Kolhapur Girgaon : कोल्हापुरातील सैनिक गिरगावच्या पठारावर थेट ग्रामपंचायतीला दमदाठी करून बेकायदेशीर गायरान जमीन उत्खननाचा "मुळशी पॅटर्न"! 

कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक सैन्य देशाला देणाऱ्या सैनिक गिरगावमध्ये ग्रामपंचायतीच्या जागेवर ग्रामपंचायत सदस्यांना दमदाठी करून बेकायदेशीर उत्खनन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Kolhapur Girgaon : कोल्हापूर (Kolhapur Girgoan) शहराच्या तिन्ही बाजूने महापुराच्या पाण्याने वाताहत होत असल्याने हाकेच्या अंतरावरील दक्षिण बाजूकडील गावांमधील जमिनींना सध्या चांगलाच भाव आला आहे. वर्ग दोनच्या जमिनी बिगरशेती करून साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करून जमिनी मिळवून त्यावर कोट्यवधी रुपये कमावण्याचा गोरखधंदा चांगलाच फोफावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून सैनिक टाकळीनंतर सर्वाधिक सैन्य देशाला देणाऱ्या सैनिक गिरगावमध्ये ग्रामपंचायतीच्या पठारवरील जागेवर (Girgaon plateau) ग्रामपंचायत सदस्यांना दमदाठी करून कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीर उत्खनन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पुण्यातील कुख्यात मुळशी पॅटर्न आता कोल्हापूरमध्येही रंगू लागला आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. 

तलाठ्यांकडे ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रार देऊनही अक्षम्य दुर्लक्ष, सर्कल, तहसिलदारांना तक्रार करूनही लक्ष न दिल्याने तसेच गट क्रमांक 1499 मधील मिळकतधारकांनी ग्रामपंचायत सदस्यांनाच दमदाठी केल्याने हतबल होण्याची वेळ आली आहे. 6 ऑक्टोबरपासून पंचायतीकडून काम थांबवण्यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरु असताना कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांकडून उपोषणाचा इशारा देऊनही काम थांबवण्यात आलेलं नाही. 

गिरगावच्या पठारावर दमदाठी करून उत्खनन 

गिरगावच्या पश्चिमेला बी. के. पाटील हायस्कुलला लागून गिरगावचे विस्तीर्ण पठार आहे. गिरगाव ग्रामपंचायतीची (Girgaon Gram Panchayat) जवळपास 4 हेक्कर गायरान जमीन आहे. या जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागाकडून 10 हजार रोपे लावण्यात आली आहेत. या जमिनीचा गट क्रमांक 1466 आहे. याच गटक्रमांकातील जमिनीवर थेट ग्रामपंचायत सदस्यांना दमदाठी करून तसेच स्थानिकांचा विरोध डावलून आतापर्यंत 18 फुट उंच, 60  फुट रुंद आणि 360 फुट लांबी असे 5184 ब्रास बेकायदेशीर उत्खनन करण्यात आले आहे. बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन केल्यास एका ब्रासला 2400 रुपये दंड ठोठावला जातो. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीर उत्खनन झाले आहे. 

तलाठ्यांकडे तक्रार करूनही अक्ष्यम दुर्लक्ष

शासकीय जमिनीवर उत्खनन होत असल्याने ग्रामपंचायत सदस्यांकडून तलाठ्यांना सांगून काम थांबवण्यासाठी पाठपुरावा सुरु होता. मात्र, तलाठ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे आणि कोणताही आदेश तक्रार केल्यापासून काढला नसल्याने कोट्यवधी रुपयांचे उत्खनन पठारच्या जमिनीवर सुरु आहे.

ग्रामस्थांसह ग्रामपंचायतने जाब विचारल्यानंतर तलाठ्याला जाग 

उत्खनन दिवसागणिक वाढतच चालल्याने शनिवारी ग्रामस्थांनी तलाठ्याला चांगलेच फैलावर घेत प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्यास सांगितले. सरपंच महादेव कांबळे, माजी उपसरपंच जालिंदर पाटील, ग्रामपंचायत सदस्य उत्तम पाटील, पोपट सुतार, उत्तम पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, सैनिक संघटनेचे शशिकांत साळोखे तसेच शेतकरी आणि तरुणांनी बेकायदेशी झालेलं उत्खनन दाखवून दिले. यावेळी गौणखनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्राॅली तसेच रोलरला नंबर प्लेट नसल्याचेही दिसून आले. त्यामुळे हा गोरखधंदा किती बेकायदेशीर सुरु आहे याचा अंदाज येतो. 

शासकीय जमिनीत उत्खनन करून सपाटीकरण!

गिरगाव ग्रामपंचायतीच्या पठारला लागूनच असलेल्या वर्ग दोनची जमिन असलेल्या गट क्रमांक 1499 मिळकतीमध्ये सपाटीकरण सुरु आहे. सपाटीकरणासाठी लागणारा मुरुम हा गिरगाव ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गट क्रमांक 1466 उत्खनन करून वापरण्यात आला आहे. तसेच बेकायदेशीरपणे मुरुमची वाहतूक करून विक्री करण्यात आल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे. 

सखोल चौकशी करून कारवाई करावी 

गिरगावचे सरपंच महादेव कांबळे यांच्यासह सदस्यांनी तक्रार करूनही दखल न घेण्यात आल्याने या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी केली. तलाठ्यांना आज जाब विचारल्यानंतर बेकायदेशीर उत्खनन झाल्याचा पंचनामा केल्याचे ते म्हणाले. रुपेश पाटील म्हणाले, गावातील सरकारी जमिनीवर उत्खनन सुरु असताना तलाठ्यांनी दुर्लक्ष करणे त्यांना पाठीशी घालणे, ही गंभीर बाब आहे. गावाच्या चारी बाजूने उत्खनन सुरु असून यामध्ये महसूल यंत्रणा सामील असल्याचा आरोप त्यांनी केला. तलाठी सुरेंद्र इंद्रेकर यांनी 5184 ब्रास बेकायदेशीर उत्खनन झाले असून त्याचा पंचनामा केल्याचे सांगितले. 

ग्रामपंचायतीने मोजणीला विरोध करूनही दमदाठीने उत्खनन 

गट क्रमांक 1499 मधील मिळकतधारकांनी मोजणी केल्यानंतर या मोजणीला गिरगाव ग्रामपंचायतीकडून कडाडून विरोध केला होता. तरीही शासकीय बळाचा वापर तसेच लाखो रुपयांच्या पैशाची भीती ग्रापपंचायतीला दाखवून बेकायदेशीर उत्खनन करण्यात आले आहे. 

वर्ग दोनच्या जमिनी करून वर्ग एक करून पैसे कमावण्याचा गोरखधंदा

गेल्या काही दिवसांपासून वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याची साखळीच महसूल विभागात कार्यरत आहे. त्यामुळे या गोरखधंद्यातून अनेक जमीन माफिया तयार झाले आहेत. वर्ग दोनमधील जमिनी नाममात्र दरात खरेदी केल्यानंतर ती वर्ग एक करून गुंठेवारीमध्ये विकून कोट्यवधी रुपये कमावण्याचा धंदाच सुरु आहे. 

कोल्हापूरच्या दक्षिणेला जमीन व्यवहार जोरात

कोल्हापूरला महापुराने वेढले असताना केवळ दक्षिणेकडील बाजूस कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नव्हते. अन्य तिन्ही बाजूंनी शहर व्यापल्याने कोल्हापूर शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पाचगावमध्येही जागा शिल्लक नसल्याने जमीन माफियांकडून आता कळंबा, गिरगाव, कंदलगाव, कणेरीवाडी, कणेरीमधील गावांमधील जमिनींवर डोळा आहे. त्यामध्येही या सर्व गावांच्या तुलनेत गिरगाव उंचावर असल्याने आणि संपूर्ण कोल्हापूरचा नजारा दिसत असल्याने जमीन माफियांनी आपले जाळे पसरण्यास सुरुवात केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mira Bhayandar News: रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरदूद
मीरा-भाईंदरमधील रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरदूद
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Mumbai Crime News: मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Embed widget