Chandrakant Patil on Sanjay Raut: संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा, चंद्रकांत पाटील यांचा टोला
खासदार संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा, असा टोला भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

कोल्हापूर : शिवसेना नेते संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र करा, त्यांच्याशिवाय मंत्रीमंडळामधील कुणीच मंत्री बोलत नाहीत, असा टोला भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी लगावला. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या स्फोटकाप्रकरणी सध्या पोलीस अधिकारी सचिन वाझे एनआयएच्या कोठडीत आहेत. दोन तपास यंत्रणाकडून तपास सुरु आहे. हळूहळू सत्य बाहेर येत असून लवकरचं सरकारचा बुरखा फाटणार असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
सचिन वाझे यांच्या अटकेनंतर भाजप सरकार मविकास आघाडीसरकार विरोधात आक्रमक झालेलं पहायला मिळत आहे. भाजपचे नेते पत्रकार परीषदा घेऊन ठाकरे सरकारवर हल्ला करताना दिसत आहे. भाजप नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परीषद घेऊन सरकार घणाघाती आरोप केले.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
- माझी सगळी भाकीत वेळेत पूर्ण होणार नाहीत, त्याला वेळ लागेल. आम्ही कुठं म्हणतोय सरकार पडणार, धोका आहे. आम्ही काहीच म्हणत नाहीय.
- दोन तपास यंत्रणांकडून तपास सुरु आहे. शोध लागला आहे, आता बुरखे फाटायला वेळ लागणार नाही. कोण कोण पायाखाली येतंय हे रात्रीपर्यंत बाहेर येईल.
- चंद्रकांत पाटील यांनी हे सांगत असताना माकड आणि माकड्याच्या पिलांची गोष्ट सांगितली. जे घडले त्यामध्ये अनिल देशमुख यांच्या खात्याची जबाबदारी आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांनी केलीय.
- पोलीस अधिकारी यांच्या गाडीत स्फोटकं सापडली, पैसे मोजायचे मशीन सापडते, पैसे सापडले? हे गंभीर असल्याचे पाटील म्हणाले.
























