एक्स्प्लोर

Majha Sanman 2023 : वाबळेवाडीच्या शाळेचा कायापालट करणाऱ्या वारे गुरुजींचा 'माझा सन्मान' पुरस्कार देऊन गौरव  

वाबळेवाडीच्या ( Wable Wadi) शाळेचा कायापालट करुन महाराष्ट्राचे नाव गाजवणाऱ्या वारे गुरुजींना (Ware Guruji) एबीपी माझाच्या वतीनं 'माझा सन्मान' पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आलं.

Majha Sanman 2023 : वाबळेवाडीच्या ( Wable Wadi) शाळेचा कायापालट करुन महाराष्ट्राचे नाव गाजवणाऱ्या वारे गुरुजींना (Ware Guruji) एबीपी माझाच्या वतीनं 'माझा सन्मान' पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आलं. एबीपी माझाच्या यंदाच्या 'माझा सन्मान' पुरस्कारांचे (Majha Sanman 2023) वितरण झालं. यामध्ये विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आहे. वारे गुरुजींनी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरजवळील वाबळेवाडी शाळेचा कायापालट केला आहे. यामुळं महाराष्ट्राचं नाव जगभरात गाजलं. त्यांच्या याच कार्यचा सन्मान एबीपी माझानं केला आहे. 'माझा सन्मान' पुरस्कार सोहळा आज (26 ऑगस्ट) रात्री आठ वाजता आणि उद्या (27 ऑगस्ट) रात्री सात वाजता एबीपी माझा चॅनेलवर पाहता येणार आहे. 

वाबळे गुरुजींच्या मेहनतीतून वाबळेवाडीची जिल्हा परिषदेची शाळा आंतरराष्ट्रीय झाली

काही दिवसांपूर्वी वाबळेवाडीची जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की नाकं मुरडली जायची. पण, आता इथं प्रवेशासाठी तीन वर्षांची वेटिंग लिस्ट आहे. केवळ व्यवस्थेकडे बोट दाखवत न बसता वारे गुरुजींनी हे करुन दाखवलं आहे. त्यांच्या कल्पनेला आणि  मेहनतीला अनेक हातांची साथ  लाभली. वाबळेवाडीची जिल्हा परिषदेची ही शाळा आंतरराष्ट्रीय झाली आहे. आधी जिल्हा परिषदेची शाळा म्हंटलं फारसं लक्ष दिलं जात न्वहतं. आता इथं प्रवेशासाठी तीन वर्षांची वेटिंग लिस्ट लागली आहे. हा फार मोठा बदल वारे गुरुजींच्या कल्पकतेमुळं झाला आहे. 

शाळेचा कायापालट करत असताना वारे गुरुजींवर अनेक आरोप

केवळ व्यवस्थेकडे बोट दाखवत न बसता वारे गुरुजींनी हे करुन दाखवलय. शाळेचा कायापालट करत असताना वारे गुरुजींवर अनेक आरोपही झाले, बदली झाली. पण बदली होऊनही गेलेल्या जालिंदरनगर शाळेचाही त्यांनी सात महिन्यात कायापालट केला आहे. नवी पिढी ज्या ज्ञानमंदिरात घडते त्या ज्ञानमंदिरांना घडवणाऱ्या वारे गुरुजींना एबीपी माझा अत्यंत अभिमानाने माझा सन्मान पुरस्कार प्रदान करत आहे.  

जालिंदरनगरच्या शाळेचाही वारे गुरुजींनी केला कायापालट

वारे गुरजींची बदली काही महिन्यांपू्र्वीच खेड तालुक्यातील कन्हेरसर गावातील जालिंदरनगरच्या शाळेत झाली. ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असतानाच वारे गुरूजींनी काही शाळेचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. गुरूजींच्या या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आता रांगा लागत आहेत. या शाळेतील मुले फ्रेंच, जर्मनी, जपानी, इंग्रजीसारख्या परदेशी भाषा अगदी सहजपणे बोलतात. केवळ 100 ते 200 नव्हे तर एक हजारापर्यंतचे विद्यार्थ्यांचे पाढे तोंडपाठ आहेत. तंत्रज्ञानातही ही मुले एक पाऊल पुढे असल्याने वारे गुरूजी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

Majha Sanman 2023 : सन्मान आपल्या माणसांचा, अभिमान महाराष्ट्राचा; आज 'माझा सन्मान पुरस्कार सोहळा', पाहा ABP Majha वर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
Embed widget