एक्स्प्लोर

स्वच्छतेला उद्योगाचं स्वरुप देणाऱ्या हणमंत गायकवाडांचा 'माझा सन्मान 2016'ने गौरव

मुंबई: सातरा जिल्ह्यातील दुर्गम भागात जन्मलेल्या हणमंत गायकवाड यांनी पुण्यात येऊन आपलं स्वत:चं वेगळं आस्तित्व निर्माण केलं. स्वच्छतेच्या कामाला उद्योगाचं स्वरुप देऊन त्यांनी आपला उद्योग संपूर्ण देशभर विस्तारला. आठ सहकाऱ्यांसोबत सुरु केलेल्या या कामात आज 65 हजारांपेक्षा जास्त कर्मचारी गुंतलेले आहेत. हणमंत गायकवाड यांना माझा सन्मान 2016 पुरस्काराने गौरवण्यात आले.   हणमंत गायकवाड यांचा थोडक्यात परिचय   रहिमतपूर या साताऱ्यातल्या दुर्गंभागात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून हणमंतरावांची परिस्थिती अत्यंत खडतर होती. इतकी की त्यांच्या खिशात एक बसच तिकिट काढायला ही पैसे नसत. त्याकाळापासून सुरू झालेला प्रवास अडचणींचा पालापाचोळा दूर सारत त्यांनी सुरू केला आणि स्वच्छाता अभियानाचा वसा हाती घेतला.   तसं बघितलं तरसाफसफाईचं काम हे हलक्या दर्जाचं काम म्हणून हिणवलं जातं. पण याच कामाचा वापर करून पुण्यातल्या हणमंत गायकवाड या उद्योजकाने बीव्हीजी या कंपनीची स्थापना केली. १९९७ साली फक्त आठ सहकाऱ्यांच्या साथीने सुरू केलेल्या या कंपनीत आज एकूण 65 हजारापेक्षाही अधिक कर्मचारी काम करतात. आज ही कंपनी राष्ट्रपती भवन, संसद भवन,दिल्ली हायकोर्ट अशा महत्त्वाच्या ठिकाणांची (क्लिनिंगग)स्वच्छता, साफसफाई आणि मेंटनन्सची कामं करते. सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत कंपनीने झेप घेतली आहे. कंपनीचा हा प्रवास सहजसोपा नव्हता, मात्र तो अशक्यलही नव्हता. "पेशन्स' ॲण्ड "क्रेडिबिलिटी' हेच दोन परवलीचे शब्द मानले, सहकाऱ्यांतही तेच बीज पेरले आणि यशाची नवीन शिखरे आपोआप सर होत गेली असं हणमंत गायकवाड सांगतात. बीव्हीजी कंपनीचे नाव सध्या विविध क्षेत्रांत अग्रेसर आहे. या कंपनीनं सिव्हील इंजिनीअरींग, लँडस्केप डिझायनींग ॲण्ड गार्डनिंग अशा क्षेत्रातदेखील क्लिनींग आणि मेंटनन्सची कामे करण्यास सुरवात केली आहे.   आज या कंपनीची कारर्कीद संपुर्ण जगभरात पसरलीय. भारतात एकवीस तर  लंडन आणि सिंगापूरमध्ये कंपनीच्या दोन शाखा उघडण्यात आल्या आहेत. येत्या दहा वर्षांत दहा हजार कोटी रुपयांच्या उलाढालीचे उद्दिष्ट हणमंत गायकवाड आणि बीव्हीजी कंपनी ठेवते.  उद्योजक हणमंत गायकवाड यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझाच्या शुभेच्छा.   संबंधित बातम्या

ललिता बाबरचा माझा सन्मान २०१६ पुरस्काराने गौरव

आपल्या आवजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या महेश काळेंचा 'माझा सन्मान २०१६'ने गौरव

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
Embed widget