#MajhaMaharashtraMajhaVision | माझा महाराष्ट्र माझं व्हिजनमध्ये सुरु आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचं व्हिजन
सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सगळं काही थांबल्यासारखं चित्र आहे. काही ठिकाणी काही गोष्टी सुरु करुन दिलासा दिला असला तरी अद्याप जनजीवन सुरळीत झालेले नाहीत. अशात महाराष्ट्रासमोर अनेक समस्या देखील उभ्या ठाकल्या आहेत. या समस्यांवर मात करत नवा महाराष्ट्र कसा घडवायचा याबाबत राज्यातील महत्वाच्या नेत्यांचं व्हिजन जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला आहे.
LIVE
Background
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राल स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच महाराष्ट्राला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होणार आहे.
सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सगळं काही थांबल्यासारखं चित्र आहे. काही ठिकाणी काही गोष्टी सुरु करुन दिलासा दिला असला तरी अद्याप जनजीवन सुरळीत झालेले नाहीत. अशात महाराष्ट्रासमोर अनेक समस्या देखील उभ्या ठाकल्या आहेत. या समस्यांवर मात करत नवा महाराष्ट्र कसा घडवायचा याबाबत राज्यातील महत्वाच्या नेत्यांचं व्हिजन जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला आहे.
महाराष्ट्राच्या गाडीचं स्टेअरिंग कुणाच्या हाती? महाराष्ट्राची ही गाडी सुसाट धावणार का? कोरोनामुळे महाराष्ट्राची गाडी पंक्चर झाली? तीन चाकांपैकी एका चाकाकडे दुर्लक्ष झालंय? सरकारची गाडी अयोध्येचा स्टॉप घेणार का? कोरोनाला रोखण्यात सरकार कितपत यशस्वी ठरलंय? या सगळ्या संदर्भात विरोधकांची भूमिका काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या विशेष कार्यक्रमातून आपल्याला मिळणार आहेत.
सर्वात मोठ्या मंचावर राज्यातील महत्वाचे नेते आपलं व्हिजन ठेवणार आहेत. हा कार्यक्रम आज दिवसभर एबीपी माझावर सुरु राहणार आहे. सकाळी दहा वाजता मनसे प्रमुख राज ठाकरे आपलं व्हिजन मांडतील आणि या कार्यक्रमाची सुरुवात होईल. तर 11 वाजता महसूल मंत्री आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे आपलं व्हिजन मांडतील. 11.30 वाजता उद्योगमंत्री सुभाष देसाई तर दुपारी 12 वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपलं व्हिजन मांडतील.
दुपारी एक वाजता आरोग्यमंत्री राजेश टोपे आपलं व्हिजन मांडतील. सध्या कोरोनाच्या काळात आणि भविष्यात देखील कोरोना आणि आरोग्याच्या दृष्टिने त्यांचं व्हिजन काय असणार? हे फार महत्वाचं आहे. तर दुपारी दीड वाजता राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे आपलं व्हिजन मांडतील. बोगस बियाणे, खरीपाची पेरणी तसेच कृषि क्षेत्रासाठी नेमकं सरकारचं काय व्हिजन असणार आहे, यावर भुसे आपलं मत व्यक्त करतील.
दुपारी दोन वाजता मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय असावं यावर चर्चा होईल. यात अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते नितीन वैद्य, संगीतकार अतुल गोगावले सहभागी होणार आहेत.
दुपारी तीन वाजता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आपलं व्हिजन मांडणार आहेत. साडेतीन वाजता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या शाळा नेमक्या कधी सुरु होणार? सुरु केल्या तरी त्याचं नियोजन कसं असेल? याबाबत व्हिजन मांडतील. दुपारी चार वाजता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे या कार्यक्रमात सहभागी होतील. मंत्री जयंत पाटील 4.30 तर मंत्री अशोक चव्हाण पाच वाजता आपलं व्हिजन मांडतील.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सायंकाळी सात वाजता कार्यक्रमात सहभागी होऊन आपलं व्हिजन मांडणार आहेत. रात्री 8 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमात सहभागी होतील. ते नव्या महाराष्ट्रासाठी त्यांचं व्हिजन काय असणार आहे, याबाबत विचार मांडतील.
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेजवर नेटीझन्सना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.