एक्स्प्लोर

Majha Katta : आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा वारकऱ्यांकडे लक्ष द्या, शाहजीबापूंची मुख्यमंत्र्यांना विनंती

Shahajibapu Patil, Majha Katta :  दहा तारखेला आषाढी एकादशी आहे. पांढूरंगाला दंडवट घालून मागणी आहे, हे लवकरात लवकर मिटू दे... उद्धव ठाकरे यांनी शिंदेसाहेबांशी बोलून हे प्रकरण मिटवावे.

Majha Katta :  दहा तारखेला आषाढी एकादशी आहे. पांढूरंगाला दंडवट घालून मागणी आहे, हे लवकरात लवकर मिटू दे... उद्धव ठाकरे यांनी शिंदेसाहेबांशी बोलून हे प्रकरण मिटवावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे, हे प्रकरण चालू राहिले तर आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा वारकऱ्यांकडे लक्ष द्यावे. 

सत्य हे शेवटी सत्य असते. त्याला कुणी झाकू शकत नाही. अन् सत्य शिंदे साहेबांच्या बाजूने जाणार. याला कारणेही आहेत. एकनाथ शिंदे संयमी आणि शांत आहेत.  त्यात त्यांना पाच वर्षाचा अनुभव असणारे देवेंद्र फडणवीस आहेत. राज्याचा पुढील अडीच वर्षाचा कारभार नक्कीच चांगला राहणार आहे. 

शिवसेनेमधील अभूतपूर्व बंडाचे साक्षीदार आणि त्यांच्या एका डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेले सांगोला विधानसभा मतदार संघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी बुधवारी माझा कट्ट्यावर हजेरी लावली. जितकी चर्चा सत्तांतराची झाली, नव्या मुख्यमंत्र्यांची झाली, शिवसेनेतील नाराजीची झाली... त्यापेक्षा जास्त फेमस शहाजी बापूंचा डायलॉग फेमस झाला. डोंगर, झाडी आणि हॉटेलचा डायलॉग फेमस झाला. त्यावर गाणेही आले. सोशल मीडियावर या डायलॉगची चर्चा रंगली आहे. शहाजी बापूंच्या, 'काय झाडी.. काय डोंगार.. काय हॉटेल.. एकदम ओक्के' या डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या डायलॉगमुळे शहाजी बापू सोशल मीडियावर एका रात्रीत स्टार झाले. सत्तांतर, नवे मुख्यमंत्री आणि शिवसेनेतील नाराजीपेक्षा शहाजी बापूंच्या या डायलॉगची चर्चा जास्त झाली. अनेकांनी त्यांना पर्यटनमंत्री करा? अशी मागणीही केली. शहाजी बापू पाटील यांनी माझा कट्ट्यावर दिलखुलास गप्पा मारल्या... 

शहाजी पाटील नेमकं आहेत तरी कोण?

  • शहाजीबापू पाटील हे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार
  • विद्यार्थी दशेपासून शहाजी पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते
  • 1985 साली त्यांनी दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली
  • 1985 च्या निवडणुकीत शहाजी पाटील यांचा पराभव
  • त्यानंतर झालेल्या निवडणुकीतही त्यांचा पराभवच झाला
  • 1995 मध्ये शहाजी पाटील हे 192 मतांनी निवडून आले
  • त्यांनी 1995 ला गणपतराव देशमुख यांचा पराभव केला
  • त्यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 पर्यंतच्या सर्व निवडणुकीत शहाजीबापूंचा पराभव झाला
  • 2019 ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला
  • 2019 ला गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करत शहाजीबापू आमदार झाले

अशी आमदार शहाजी पाटील यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. त्यांच्या बोलण्यात ग्राणीण ढंग आहे. त्यामुळं त्यांच्या भाषणाची सातत्यानं चर्चा देखील होत असते. अनेकवेळा त्यांची वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, 2019 मध्ये शहाजी पाटील यांनी भाजपकडे तिकीट मागितले होते. मात्र, युतीत ही जागा शिवसेनेकडे असल्यानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शिवसेनेतून निवडून आणलं. त्यामुळंच फडणवीस यांच्यासोबत शहाजी पाटील यांची चांगलीच गट्टी आहे. त्यामुळं ते त्यांच्या संभाषणात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे होणार असल्याचे म्हणत आहेत. फडणवीसांचे आणि माझे नाते हे भाव-भावासारखे आहे, तर शिंदेसाहेब मला मुलाच्या नजरेनं बघतात असेही पाटील म्हणालेत.  

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget