एक्स्प्लोर

Aamir Khan Majha Katta: आमिर खानचं शेतकऱ्यांना गिफ्ट, 'सत्यमेव जयते फार्मर कप' या स्पर्धेची घोषणा

आमिर खानने 'सत्यमेव जयते फार्मर कप' या स्पर्धेची घोषणा करुन शेतकऱ्यांना एक प्रकारचे गिफ्ट दिले आहे. या शेतकरी गटाला तज्ञांचे मार्गदर्शन देखील देणार असल्याचे त्याने सांगितले.

Aamir Khan and Satyajit Bhatkal Majha Katta : शेतकऱ्यांनी गट शेती केल्यामुळे उत्पादन खर्च कमी येईल. तसेच शेतकऱ्यांच्या अनेक समस्या कमी होतील असे मत अभिनेता आमिर खान याने व्यक्त केले. आपल्याला परिसंस्था तयार करायची आहे. शेतकऱ्यांना आणखी ज्ञानी करण्यासाठी काम करायचे असल्याचे त्याने सांगितले. यावेळी आमिर खानने 'सत्यमेव जयते फार्मर कप' या स्पर्धेची घोषणा करुन शेतकऱ्यांना एक प्रकारचे गिफ्ट दिले आहे. या शेतकरी गटाला तज्ञांचे मार्गदर्शन देखील देणार असल्याचे त्याने सांगितले. आधी आम्ही पाणी जिरवले आहे, आता आम्हाला शिवार फुलवायचा असल्याचे तो म्हणाला. 

एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दहा दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात येणार आहे. यावेळी अभिनेता आमिर खान आणि सत्यजित भटकळ यांच्याशी साधला. यावेळी त्यांनी शेतीसंदर्भात करत असलेल्या कामासंबंधीची भूमिका मांडली.

फक्त पाण्यावर थांबून चालणार नाही

मी गावात जन्मलो असतो तर आज मी वेगळा असलो असतो. फिल्म आणि शेती याचा जवळचा संबंध असल्याचे आमिर खानने सांगितले. शेतीमध्ये विविधता आहे. शेतकऱ्यांचे आणि आमच्या समस्या सारख्याच असल्याचे आमिरने सांगितले. चार वर्ष आम्ही पाणी आडवा पाणी जिरवा यावर काम केले. अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. पाण्याची क्षमता खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आमिर खान याने सांगितले. या चार वर्षाच्या काळात आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. मात्र, आता फक्त पाण्यावर काम करुन चालणार नाही तर मृदा संवर्धन, पिक पद्धती, पाण्याचा वापर कसा करायला हवा याबाबत काम करावे लागणार आहे. प्रथम आम्ही राज्यातील 3 तालुक्यात काम सुरु केले, त्यानंतर 30 आणि शेवटी 70 तालुक्यात काम केल्याचे आमिर खानने सांगितले. गेल्या चार वर्षाच्या काळात आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आहे. 


Aamir Khan Majha Katta: आमिर खानचं शेतकऱ्यांना गिफ्ट, 'सत्यमेव जयते फार्मर कप' या स्पर्धेची घोषणा

कोरोना काळात पणती तेवत ठेवणाऱ्या जलमित्रांना सलाम

वॉटर कप स्पर्धेची तयारी सुरु झाली होती त्यावेळी कोरोनाची संकट आले. या काळात कसे काम करणार हे मोठे आव्हान होते. याकाळा आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग सुरु केले. जसे पाहिजे तशी ही दोन वर्ष  गेली नसल्याचे आमिर खानने सांगितले. कोरोना काळात संकटे असूनही जलमित्रांनी पणती तेवत ठेवली. एकाही गावात पणती विझली नाही. त्यांनी सातत्याने कामे सुरु ठेवली. त्या सर्व जलमित्रांना सलाम असल्याचे सत्यजित भटकळ यांनी सांगितले. गावात पाणी येते त्यावेळी त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणी मोजणे गरजेचे असते असे भटकळ म्हणाले.

20 शेतकरी कुटुंबाचा सहभाग असणार

एक पीक एक गट यावर आधारीत 'सत्यमेव जयते फार्मर कप' ही स्पर्धा आयोजीत केली आहे. गट शेतीतील स्पर्धकांना शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ यांनी सांगितले. या स्पर्धेत किमान 20 शेतकरी कुटुंबाचा सहभाग असणार आहे. राज्यपातळीवर यासाठी बक्षीसे दिली जाणार आहेत. राज्यपातळीवर प्रथम येणाऱ्या शेतकरी गटाला 25 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. दुसरे बक्षीस 15 लाख, तर तिसरे बक्षीस 10 लाख रुपये दिले जाणार आहे. एकूण 42 रोख बक्षीसे दिली जाणार असल्याचे भटकळ यांनी सांगितले.

1 हजार ग्रामपंचायतीमध्ये मोठे काम केले

पाणी फाऊंडेशनच्या कामाची सुरुवात झाली होती त्यावेळी 9 हजार ग्रामपंचायतीमध्ये काम सुरु केले होते. यातील 1 हजार ग्रामपंचायतीमध्ये मोठे काम केले. तिथे आता पाण्याची स्थिती खूप चांगली आहे. त्याठिकाणी आता गंज खात पडलेले टॅकर दिसत असल्याचे सत्यजित भटकळ यांनी सांगितले. आमचे ध्येय पुर्णपणे साध्य झाले नाही पण प्रक्रिया सुरु झाली आहे. पाण्याचे व्यवस्थापन हे सामुहिक पातळीवर झाले पाहिजे असे ते म्हणाले. त्यामुळेच सत्यमेव जयते फार्मर कप अशी स्पर्धा आयोजीत केली असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही दोघे जण शाळेत असल्यापासून एकत्र आहोत असे भटकळ यानी सांगितले. आमच्यामध्ये बरेच साम्य आहे. अनेक मुद्दे वेगळेही आमच्यात आहेत असे त्यांनी सांगितले. यावेळी अमिर खाने याने 'एकजुटीन पेटलं रान तुफान आलया' गाणं म्हणून सर्वांची मने जिंकली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बँक FD की अल्पबचत योजना? 2026 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँक FD की अल्पबचत योजना? 2026 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती 
मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीविरोधात थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आक्रमक
मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीविरोधात थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आक्रमक
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget