एक्स्प्लोर

Majalgaon : घरात करंट उतरला अन् होत्याचं नव्हतं झालं! बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू, माजलगावातील घटना

Majalgaon : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे माजलगाव परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे

Majalgaon : घराच्या छतावर विद्युतप्रवाह उतरल्याने दोन चिमुकल्या चुलत भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना माजलगाव (Majalgaon) तालुक्यातील टालेवाडी येथे घडली आहे. बारा वर्षाची साक्षी भारत बडे व आठ वर्षाचा सार्थक अशोक बडे या चिमुकल्याच्या मृत्यूमुळे माजलगाव परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे

माजलगाव तेलगाव रस्त्यावर असलेल्या टालेवाडी येथील साक्षी भारत बडे वय 12 वर्षे व सार्थक अशोक बडे वय 8 वर्षे हे भरत बडे यांच्या घरात खेळत असतांना छतामध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने या दोघा सख्या चुलत बहिण-भावाचा मृत्यू झाला असल्याची घडली असावी असा अंदाज बडे कुटुंबियनी वर्तवला आहे.

घराच्या छतावर करंट उतरत असल्याचा महावितरणकडे केल्या होत्या तक्रारी.

ही घटना ज्या घरांमध्ये घडली आहे त्या घराच्या बाजूला एक डीपी आहे मात्र या डीपीवरून अनेक वेळा घरामध्ये परत उतरले याची तक्रार या परिसरातील नागरिकांनी केली होती..याबाबत गावातील नागरिकांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत वेळोवेळी कळवुन देखील त्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. आणि म्हणून या करंट मुळे दोन चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला आहे..

दुपारच्या वेळी सार्थक आणि साक्षी हे बहिण भाऊ खेळत असताना त्यातील सार्थक हा छतावर जाण्यासाठी चढत असताना त्याला शॉक लागला असावा व त्यानंतर साक्षी ही त्याला पाहायला गेली असता तिला देखील करंट लागल्याने हे दोघे एकमेकांच्या अंगावर पडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

या डीपीवरून करंट उतरल्यास या भागात असलेल्या 40 ते 50 घरांमध्ये करंट उतरतो व या करंट मुळे घरातील पंखे व बल्प ऑटोमॅटिक फिरत असल्याचे गावकरी सांगताना दिसत होते. या दोघांना माजलगाव येथील एका खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दोघांवर रात्री नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोघांच्या मृत्यू मुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Devendra Fadnavis in Nagpur: देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या तरुणीचा पुनर्विवाह, कोरोनामुळे जोडीदार गमावलेल्या तरुणीच्या आयुष्यात नवी पहाट
देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या तरुणीचा पुनर्विवाह, कोरोनामुळे जोडीदार गमावलेल्या तरुणीच्या आयुष्यात नवी पहाट
Sugar Prices News : साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Embed widget