Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Chhatrapati Sambhajinagar Crime News : गावामध्ये सप्ताह सुरू असल्याने घटनेच्यावेळी कुटुंबातील सदस्य घराबाहेर गेले होते, त्यावेळी तरूणानं टोकाचं पाऊल उचललं.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर (Chhatrapati Sambhajinagar) तालुक्यातील खंडाळा येथे नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याने त्याच्या खोलीतच गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना काल (बुधवारी (दि.19) घडली. सूरज सुभाष शिंदे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. नीट परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून (Chhatrapati Sambhajinagar) त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचे प्राथमिक पोलिस तपासात समोर आले आहे. सूरज हा घरीच नीट परीक्षेची तयारी करीत होता. जीवन संपवण्यापूर्वी त्याने दोन ओळींची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये, ‘सॉरी, आई आणि आप्पा, नक्कीच पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर बनेल. काळजी घ्या आणि आनंदी राहा,’ असा मजकूर असल्याचे समोर आले आहे.(Chhatrapati Sambhajinagar)
Chhatrapati Sambhajinagar News: घरी कोणी नसताना उचललं टोकाचं पाऊल
या घटनेवेळी घरी कोणी नव्हते अशी माहिती समोर आली आहे. गावामध्ये सप्ताह सुरू असल्याने घटनेच्यावेळी कुटुंबातील सदस्य घराबाहेर गेले होते. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांनी सूरजला फोन केला. मात्र, त्याचा फोन बंद असल्याचे आढळले. त्यानंतर त्याच्या लहान बहिणीने वरच्या खोलीत जाऊन पाहिले असता सूरज गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तिच्या आरडाओरडीनंतर कुटुंबीयांनी तातडीने धाव घेतली. सूरजला तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.(Chhatrapati Sambhajinagar)
Chhatrapati Sambhajinagar News: शेवटच्या चिट्ठीत मागितली माफी अन्..
“सॉरी आई आणि आप्पा... नक्कीच पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर बनेन... काळजी घ्या आणि आनंदी राहा...”, अशी चिठ्ठी लिहून १९ वर्षीय सूरज सुभाष शिंदे याने टोकाचं पाऊल उचललंय. खंडाळा-भवरबेंद गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. सुरज नीटची तयारी करत होता आणि घरातील वरच्या खोलीत तो नेहमी अभ्यास करत असे. गावात सप्ताह सुरू असल्याने कुटुंबीय बाहेर गेले होते. दुपारी घरी परतल्यानंतर सुरजचा फोन बंद असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर कुटुंबीयांनी वरच्या खोलीत जाऊन पाहिलं असता सुरजने गळफास घेतल्याचं समोर आलं.
कुटुंबीयांनी त्याला तातडीने वैजापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. या घटनेची वैजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. डॉक्टर होण्याचं स्वप्न, आई-वडिलांची माफी मागणारी चिठ्ठी आणि अवघ्या १९व्या वर्षी सुरजचा दुर्दैवी अंत, या घटनेने संपूर्ण खंडाळा गावावर शोककळा पसरली आहे.






















