Mahesh Manjrekar : राज ठाकरेंवरील बायोपिकचे नाव बुद्धिबळ, सलमानसोबत पिक्चर नाही, जब्बार पटेलांवर मोठा आरोप; फिल्म इंडस्ट्री हादरवणारा महेश मांजरेकरांचा माझा कट्टा
Mahesh Manjrekar On Majha Katta : चित्रपटसृष्टीतील आलेले आपले अनुभव सांगताना दिग्दर्शक महेश मांजरेकांनी अनेक भन्नाट किस्से शेअर केले.

मुंबई : आपल्याला राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर एक बायोपिक करायचं आहे, त्याबद्दल लिहिलं असून बुद्धीबळ (Bhuddibal) असं त्याचं नाव आहे अशी इच्छा दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकांनी (Mahesh Manjrekar) व्यक्त केली. तसेच सलमान खानला (Salman Khan) चित्रपटातील सर्व काही कळतं असा त्याचा समज आहे, त्याच्यासोबत पुन्हा चित्रपट करायचा नाही असंही ते म्हणाले. महेश मांजरेकांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा (Majha Katta) या कार्यक्रमात चित्रपटसृष्टी आणि त्यांचे अनुभवांवर संवाद साधला. महेश मांजरेकर यांच्यासोबतचा माझा कट्टा उद्या शनिवारी 25 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता एबीपी माझावर पाहाता येईल.
Mahesh Manjrekar On Raj Thackeray : राज ठाकरेंची बायोपिक करायची आहे
महेश मांजरेकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मैत्री सर्वांनाच माहिती आहे. त्यासंबंधी एका प्रश्नावर उत्तर देताना महेश मांजरेकर म्हणाले की, "मला राज ठाकरेंची बायोपिक करायची आहे. मी त्यावर लिहिलं देखील आहे आणि त्याचं नाव बुद्धीबळ ठेवलं आहे. त्यातील एक सीन मला दिसतोय. त्यामध्ये राजने बाळासाहेबांना विचारलं की का? एका वडिलांच्या आणि काकाच्या लढाईत वडीलच जिंकले. मला हे वाक्य खूप मला खूपच ब्रिलियंट वाटलं. काकाच्या आणि वडिलांच्या युद्धात नेहमी वडिलच जिंकतात."
Mahesh Manjrekar On Jabbar Patel : जब्बार पटेल यांच्यावर आरोप
महेश मांजरेकरांनी एक आठवण सांगत ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्यावर आरोप केले. ते म्हणाले की, "जब्बार पटेल यांनी पु. ल. देशपांडेंच्या भावाच्या मुलाच्या चित्रपटाला परवानगी देऊ नका असं सांगितलं. तो चित्रपट त्यांनी आधी बघायला पाहिजे होता, त्याच्या आधीच त्याला परवानगी देऊ नका असं जब्बार पटेल यांनी सांगितलं होतं."
Mahesh Manjrekar On Salman Khan : सलमानसोबत दुसरा चित्रपट करणार नाही
सलमान खान याच्यासोबतचा अनुभव सांगताना महेश मांजरेकर म्हणाले की, "सलमान खानचा अंतिम नावाचा एक चित्रपट केला. मला जर कुणी सलमानचा दुसरा चित्रपट करायला सांगितलं तर त्याला मी नाही म्हणेन. कारण त्याला वाटतं की त्याला चित्रपटातील सर्व कळतं. त्याचे वडील निर्माते आहेत. एकदा तो शुटिंगला खूप वेळाने आला. त्यावर मी त्याच्यावर चिडलो. तो म्हणाला की, शिव्या का देतोस? मी त्यावर म्हणालो, मी तुला शिव्या देत नाही तर तुझ्यामध्ये जो दिग्दर्शक लपला आहे त्याला शिव्या देतोय. तू मला एकदा चित्रपट दिलास तर मग सगळं विसरून जायचं."
ही बातमी वाचा:
























