Mahavitaran Strike : महावितरण कर्मचारी 3 दिवस संपावर, खासगीकरणाविरोधात आक्रमक पवित्रा
Mahavitaran Strike Against Privatization : महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Mahavitaran Strike Against Privatization : महावितरणचे (Mahavitaran) अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. खासगीकरणाला विरोध (Mahavitaran Privatization)करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला (Adani Group) वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळे महाराष्ट्रातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास, मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
महावितरण कर्मचाऱ्यांचा तीन दिवसीय संप
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (Maharashtra State Electricity Distribution Company) अर्थात महावितरणचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आज 03 जानेवारी 2023 रोजी मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. महावितरण कर्मचाऱ्यांकडून तीन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. महावितरणचे खासगीकरण करण्याच्या विरोधात ही संपाची हाक देण्यात आली आहे. गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप तीन दिवसांनंतरही सुरु ठेऊन अशी भूमिका माहावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
'अदानी कंपनीला वीज वितरणचा परवाना मिळू नये'
महावितरणचे खासगीकरण केले जाणार आहे. अदानी कंपनीने समान वीज वितरणासाठी परवानगी मागितली आहे. तसेच यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकार अदानी समूहाला वीजवितरणाचा परवाना देण्याची शक्यता आहे. अदानी कंपनीला कोणत्याही परिस्थितीत वीज वितरणाचा परवाना मिळू नये, ही या संपकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. या संपात राज्याताली 30 संघटना सहभागी होणार आहेत. दरम्यान या काळात वीजपुरवठा करण्याची जबाबदारी ही वरिष्ठ अधिकारी आणि सरकारची असाल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
पाहा व्हिडीओ : महावितरणच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी कर्मचारी संपावर
महावितरणने संप मागे घ्यावा : विश्वास पाठक
अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप महावितरण कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान राज्य सरकारने मेस्मासारखा कायदा लागू केला तर ठिगणी उडेल. त्यामुळे महावितरणने संप मागे घ्यावा अशी प्रतिक्रिया महावितरणाचे संचालक विश्वास पाठक यांनी दिली आहे.
महावितरणच्या संपाला 'आप'चा पाठिंबा
दरम्यान, खासगीरकरणाविरोधातील महावितरणच्या संपाला आम आदमी पक्षाने पाठिंबा दिला आहे. मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांनी याबाबत प्रतिक्रिया देत सांगितले आहे की, देशातील विमानतळे, बंदरे, धारावी पुनर्विकास प्रकल्प, बीएसईएस यानंतर आता सरकारी वीज वितरण कंपनी महावितरण या कंपनीलाही केंद्रातील भाजप सरकार अदानी समूहाच्या घशात घालत आहे.' भाजपवर आरोप करत आरोप आपने महावितरणच्या संपाला पाठिंबा दिला आहे.