LIVE UPDATES | बांधावर नेते | राज्य सरकार किंवा केंद्र सरकार असो, शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज : खासदार संभाजीराजे
बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
LIVE
Background
शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वपक्षीय नेते दौऱ्यावर
मुंबई : गेल्या चार पाच दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार
राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. दरम्यान, त्याआधी विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता मुख्यमंत्री सोमवारी दौऱ्यावर येत आहेत. गेल्या चार पाच दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत. दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र घराबाहेर पडत नसल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना काळात देखील मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडलेले नाहीत. त्यामुळं सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंचा दौरा
मराठवाड्यातील शेतकरी ओल्या दुष्काळाच्या झळा सोसतोय. या पार्श्वभूमीवर शरद पवार आजपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. तर आज सकाळी सात वाजल्यापासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती व इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करत आहेत.अजित पवारांच्या दौऱ्याच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे यांनी देखील बारामतीच्या नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा सुरू केला आहे. काल सकाळी दहा वाजल्यापासून ते बारामती तालुक्यातील कर्हावागज यानंतर जळगाव क.प. येथील नुसकानग्रस्त भागाची पाहणी करून ते जेजुरी त्यानंतर पुरंदर, हवेली या भागांची पाहणी करणार आहेत. सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यातील विविध भागांचा दौरा करून दौंड तालुक्यातील ही नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर आज त्या बारामती पुरंदर आणि हवेली या गावांच्या दौऱ्यावर आहेत.
अतिवृष्टी भागात तीन दिवस देवेंद्र फडणवीस करणार दौरा
शेतकर्याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे 19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा दौरा करणार आहेत. 19 ला ते बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्या दिवशी, 20 रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्या दिवशी 21 रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील.
उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख काल दुपारी 1 वाजता जिल्ह्यात दाखल झाले. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या येणेगूर या गावांच्या शिवारातल्या महामार्गालगतच्या शेताची त्यांनी पाहणी केली.
परतीच्या पावसाचा फटका
अन्नदात्याला पूर्णपणे वार्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे. कोकणात धान, मराठवाड्यात सोयाबीन, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीन, कपाशी, ज्वारी, धान अशा पिकांना मोठा फटका बसला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, तसेच विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, नांदेडमध्ये सोयाबीन पीकांना कोंब फुटली आहेत. तर सोलापूर, उस्मानाबादमध्ये तर काही ठिकाणी सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्याचं दिसलं. अहमदनगर जिल्ह्यात खरिपाचे सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी काढणीला आले असताना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे.