एक्स्प्लोर

शिवसेना, भाजपमध्ये पुन्हा जवळीक वाढतेय!

मुख्यमंत्रीपदाच्या वाटपावरुन दूर गेलेली शिवसेना आणि भाजप पुन्हा जवळ येताना दिसत आहे. अलिकडील काही दिवसांमध्ये भाजप नेत्यांच्या वक्तव्यांमधून याचे संकेत मिळत आहे.

मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा जवळीक वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांतील घटनांमधून याचे संकेत मिळतायेत. ऑक्टोबर 2019 मध्ये एकत्र निवडणूक लढल्यानंतर शिवसेनेने भाजपशी युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केला. मात्र, सध्या भाजपच्या काही नेत्यांची वक्तव्य पाहाता ते शिवसेनेबाबत सकारात्मक असल्याचं दिसून येतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी एनआरसीवर घेतलेल्या भूमिकेने या चर्चांना अधिक उधाण आलंय. भाजपने शिवसेनेसोबत अन्याय केला, ही आमची चुक असल्याचं वक्तव्य अर्थसंकल्पातील चर्चेवेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पुढे ते म्हणाले, की मान्य आहे आम्ही चूक केली. मात्र, भविष्यात ही चूक सुधारली जाऊ शकते. पण, याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादीने घेणं चुकीचं होतं. सभागृहातील मुनगंटीवार यांच्या या वक्तव्याने भाजपची शिवसेनेविषयी भूमिका सौम्य होत असल्याचं दिसून येतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीवारी मागच्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर सुधारित नागरिकत्व कायद्याला आपलं समर्थन असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. लोकसभेत हे विधेयक पास होत असतानाही शिवसेनेने याचं समर्थन केलं होतं. मात्र, राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांचा विरोध पाहता, राज्यसभेत हे विधेयक पास होताना सेनेने मतदानात भाग घेतला नव्हता. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर सुधारित नागरिकत्व कायद्याचं मुख्यमंत्र्यांनी उघड समर्थन केलं. यावरुन भाजप आणि शिवसेनेत जवळीक वाढत असल्याचं दिसून येतंय. अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय, तर पश्चिम महाराष्ट्रावर सरकार मेहरबान : देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'अर्थसंकल्प - सोप्या भाषेत' या पुस्तकाचे प्रकारशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी फडणवीस यांच्याकडे कटाक्ष टाकत या पुस्तकाचं प्रकाशन मला फडणवीस यांच्यामुळे करावं लागतय, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. याचा अर्थ त्यांनी मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं असतं, तर ते स्वतः आज मुख्यमंत्री असते. शिवसेना आणि भाजपने 2019 ची विधानसभा निवडणूक युतीतर्फे लढले होते. निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा केला. मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष विभागून घ्यावे, अशी सेनेची मागणी होती. युतीअगोदर मुख्यमंत्रीपदाबद्दल ठरलं असल्याचा दावा शिवसेनेने केला होता. मात्र, असा कोणताच करार आमच्यात झाला नसल्याचं भाजपचं म्हणणं होतं. यावर नाराज होत, उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची 25 वर्षांहून अधिककाळाची युती तोडत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. मुनगंटीवार म्हणाले आम्ही चुकलो, अजित पवार म्हणतात, 'चुकीला माफी नाही'! महाराष्ट्रात सत्तेसाठी भाजपकडून हालचाली महाराष्ट्र राज्य हे सर्वचं दृष्टीने खूप महत्वाचे राज्य मानले जाते. बऱ्याच ठिकाणी बहुमत नसताना भाजपने सत्ता मिळवली आहे. मात्र, राज्यात बहुमत असताना भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागत आहे. त्यामुळे राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. अनेक मुद्द्यांवर महाविकासआघाडीमध्ये सुसंवाद नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे हे सरकार पडेल आणि शिवसेनेला सोबत घेऊन राज्यात पुन्हा सरकार स्थापन करता येईल, अशी आशा भाजपला वाटत असल्यांचं राजकीय विश्लेषकांचे म्हणणं आहे. Ajit Pawar-Sudhir Mungantiwar | मुनगंटीवार म्हणाले आम्ही चुकलो, अजित पवार म्हणतात, 'चुकीला माफी नाही'!

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

Embed widget