Maharashtra Weather : पुढील 48 तास पावसाची शक्यता, थर्टी फर्स्टला पावसाची हजेरी; हवामान खात्याने काय म्हटलं?
Cold Weather in Maharashtra, IMD Rain Update : वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वर्षाच्या शेवटी नववर्षाच्या सुरुवातीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने काय म्हटलं, वाचा सविस्तर.
Maharashtra Weather Update Today : महाराष्ट्रात सध्या गारठा वाढला असून आता हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. 30 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान राज्यासह देशाच्या काही भागात पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह (Mumbai) उपनगर, ठाणे (Thane), कोकण आणि विदर्भात थंडीची लाट पसरली आहे. देशाच्या उत्तरेकडे तापमानात घट (Cold Wave) झाल्याचा परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावरही दिसून येत आहे. सध्या राज्यातील थंडी कमी झाली आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ढगांमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग कमी झाला आहे. परिणामी किमात तापमानात किंचित वाढ झाली आहे. मात्र, गारठा कायम आहे. नागरिक शेकोटी आणि गरम कपड्यांच्या आधार घेताना दिसत आहेत. दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वर्षाच्या शेवटी नववर्षाच्या सुरुवातीला पावसाची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.
राज्यासह देशात थंडीचं आगमन
काही दिवस नागरिकांना थंडीपासून दिलासा (Cold Wave) मिळताना दिसणार नाही. लोकांना जास्त सूर्यप्रकाश मिळणार नाही. राज्यासह देशात थंडीचं आगमन झाल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. येत्या काही दिवसात लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटलं आहे. या परिस्थितीत आजचं तापमान कसं असेल ते जाणून घ्या.
राज्यातील हवामानात चढ-उतार
येत्या काही दिवसात राज्यातील (Maharashtra Weather) हवामानात चढ-उतार पाहायला मिळणार आहे. राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता असून काही भागात पावसाचा अंदाज (Rain Prediction) हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. 30 डिसेंबरपासून 2 जानेवारी दरम्यान राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी (Rain Alert) पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रातील तापमानात घट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
काही ठिकाणी पावसाची हजेरी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अहमदनगर, पुणे, जळगाव, कोल्हापूर आणि महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक थंडी आहे. हवामाना खात्याच्या अंदाजानुसार, 2 जानेवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि अरबी समुद्रावर बाष्पयुक्त ढग निर्माण झाल्यामुळे राज्यासह देशाच्या हवामानावर याचा परिणाम दिसून येणार आहे, त्यामुळे 2 डिसेंबरपर्यंत राज्यात देशात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल.