Weather Update : मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाची शक्यता, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather Update : पुढील 24 राज्यात विविध भागात पावसाची हजेरी (Monsoon Update) पाहायला मिळणार आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्यात सद्या ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाची संततधार सुरु आहे, तर काही ठिकाणी ऊन पडल्याचं दिसत आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाला होता, मात्र गेल्या 24 तासांत अनेक ठिकाणी रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. आजही मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आज हवामान कसं असेल?
पुढील 24 राज्यात विविध भागात पावसाची हजेरी (Maharashtra Monsoon Update) पाहायला मिळणार आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोंकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळासह 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 14, 2024
शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता आहे.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३°C आणि २६°C च्या आसपास असेल.
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 13, 2024
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/8Arkd2742t
मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाची शक्यता
मुंबईत गेल्या 24 तासांत काही ठिकाणी हल्का पावसाची नोंद झाली आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबईसह कल्याण, डोंबिवलीमध्ये पावसाची रिमझिम पाहायला मिळाली आहे. पुढील 24 तासांत शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33°C आणि 26°C च्या आसपास असेल.
मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यलो अलर्ट
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सांगली, सोलापूर, चंद्रपूर, लातूर, नांदेड या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासांसाठी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :