एक्स्प्लोर

सावधान! आजही अवकाळी पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट' जारी

हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आलाय.

Maharashtra Weather Update News : राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पावसाचा काही भागात शेती पिकांना (Agriculture Crop) देखील फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आलाय. दरम्यान, या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. जाणून घेऊयात हवामानाविषयी सविस्तर माहिती.  

'या' भागात पडणार वादळी पाऊस

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (Imd), राज्याच्या विविध भागत अवकाळी पाऊस (Unseasonal rain) पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकणातील काही भागात जोरजार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता

दरम्यान, कोकणाबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर या भागातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. 

पावसाच्या अंदाजामुळं मतदान सकाळीच करावं

दरम्यान, राज्यात पुढील चार दिवस जोरदार वादळी पावसाची शक्यता कायम आहे. 12 ते 13 मे या काळात अहमदनगर नाशिक पुणे सातारा बीड परभणी जालना छत्रपती संभाजी नगर या भागात दुपारनंतर जोरदार ते मुसळधार वादळी विजांसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक विजय जायभावे यांनी व्यक्त केलाय. तर 13 मे रोजी वरील जिल्ह्यातील काही ठिकाणी मतदान असल्यामुळं शक्यतो सकाळी लवकर मतदान करणे गरजेचं आहे. दुपारनंतर वादळी पाऊस काही भागात असल्यामुळं शक्यतो मतदान सकाळीच करावे असं आवाहन करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

राज्यात अजून किती दिवस राहणार अवकाळीचा जोर? कुठं कुठं पडणार पाऊस? सविस्तर माहिती एका क्लिकवर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suniel Shetty Invests In Excelmoto Electric Mobility: सुनील शेट्टीनं जावई, लेकासोबत सुरू केलाय नवा बिझनेस; महिलांसाठी उपयुक्त वस्तू केलीय लॉन्च
सुनील शेट्टीनं जावई, लेकासोबत सुरू केलाय नवा बिझनेस; महिलांसाठी उपयुक्त वस्तू केलीय लॉन्च
Mumbai Crime News : लाचखोर वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षकावर कारवाईचा बडगा; पोलीस महासंचालकांकडून बडतर्फीची कारवाई
लाचखोर वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षकावर कारवाईचा बडगा; पोलीस महासंचालकांकडून बडतर्फीची कारवाई
Prashant Padole : शेतकऱ्यांना एक लाख रुपये द्या, अन्यथा तुम्हाला उडवून देऊ; भंडाऱ्याच्या खासदाराचा पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांना इशारा
शेतकऱ्यांना एक लाख रुपये द्या, अन्यथा तुम्हाला उडवून देऊ; भंडाऱ्याच्या खासदाराचा पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांना इशारा
Mahesh Manjrekar On Siddharth Bodke: छत्रपतींच्या भूमिकेसाठी निगेटिव्ह रोल्स करणाऱ्या सिद्धार्थ बोडकेलाच का निवडलं? महेश मांजरेकरांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं...
छत्रपतींच्या भूमिकेसाठी निगेटिव्ह रोल्स करणाऱ्या सिद्धार्थ बोडकेलाच का निवडलं? महेश मांजरेकरांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maoist Ceasefire : 'केंद्र, छत्तीसगड, महाराष्ट्र सरकारनेही शांततेसाठी प्रयत्न करावेत,' माओवादी प्रवक्ते जगन यांची अपेक्षा
Local Body Election : स्थानिक निवडणुका BJP स्वबळावर लढणार, Heena Gavit यांची Nandurbar मध्ये घोषणा
Powai Encounter: 'आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला', Rohit Arya प्रकरणी पोलिसांचा दावा
Satara Doctor Case : 'SIT चौकशी झालीच पाहिजे', MARD चा संप तीव्र, सरकारवर दबाव
Hindi Language : त्रिभाषा समितीचे अध्यक्ष Narendra Jadhav, MNS अध्यक्ष Raj Thackeray यांची भेट घेणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suniel Shetty Invests In Excelmoto Electric Mobility: सुनील शेट्टीनं जावई, लेकासोबत सुरू केलाय नवा बिझनेस; महिलांसाठी उपयुक्त वस्तू केलीय लॉन्च
सुनील शेट्टीनं जावई, लेकासोबत सुरू केलाय नवा बिझनेस; महिलांसाठी उपयुक्त वस्तू केलीय लॉन्च
Mumbai Crime News : लाचखोर वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षकावर कारवाईचा बडगा; पोलीस महासंचालकांकडून बडतर्फीची कारवाई
लाचखोर वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षकावर कारवाईचा बडगा; पोलीस महासंचालकांकडून बडतर्फीची कारवाई
Prashant Padole : शेतकऱ्यांना एक लाख रुपये द्या, अन्यथा तुम्हाला उडवून देऊ; भंडाऱ्याच्या खासदाराचा पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांना इशारा
शेतकऱ्यांना एक लाख रुपये द्या, अन्यथा तुम्हाला उडवून देऊ; भंडाऱ्याच्या खासदाराचा पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांना इशारा
Mahesh Manjrekar On Siddharth Bodke: छत्रपतींच्या भूमिकेसाठी निगेटिव्ह रोल्स करणाऱ्या सिद्धार्थ बोडकेलाच का निवडलं? महेश मांजरेकरांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं...
छत्रपतींच्या भूमिकेसाठी निगेटिव्ह रोल्स करणाऱ्या सिद्धार्थ बोडकेलाच का निवडलं? महेश मांजरेकरांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं...
Maharashtra Live blog: रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणात मानवाधिकार आयोगाकडून चौकशीचे आदेश
Maharashtra Live blog: रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणात मानवाधिकार आयोगाकडून चौकशीचे आदेश
Salman Khan Shirtless Look: 59 वर्षांच्या भाईजानचा शर्टलेस लूक पाहून तरुणींचे हॉर्टफेल; सिक्स पॅक अ‍ॅब्सची बातच और... PHOTOs
59 वर्षांच्या भाईजानचा शर्टलेस लूक पाहून तरुणींचे हॉर्टफेल; सिक्स पॅक अ‍ॅब्सची बातच और... PHOTOs
Amol Muzumdar: 'बायकोला सांगून ठेवलं होतं, इकडे काय घडतंय ते मला अजिबात सांगू नकोस'; पार्ल्यातील घरी आल्यावर अमोल मुझुमदारांनी सांगितलं 'ते' सिक्रेट
'बायकोला सांगून ठेवलं होतं, इकडे काय घडतंय ते मला अजिबात सांगू नकोस'; अमोल मुझुमदारांनी सांगितलं 'ते' सिक्रेट
Pune Leopard Attack: बिबट्याला जगवायचं की माणसाला, ते ठरवा! गावकऱ्यांचा राज्य सरकाला अल्टिमेटम, मंत्रालयात महत्त्वाची बैठक
बिबट्याला जगवायचं की माणसाला, ते ठरवा! गावकऱ्यांचा राज्य सरकाला अल्टिमेटम, मंत्रालयात महत्त्वाची बैठक
Embed widget