एक्स्प्लोर

Rain Alert : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अवकाळी पावसाची हजेरी, पुढील 4-5 दिवस पावसाची शक्यता कायम

Maharashtra Rain Update : राज्यात आज अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून पुढील 4-5 दिवस पावसाची शक्यता कायम आहे.

मुंबई : राज्यात आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (Gudi Padwa 2024) अवकाळी पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजनुसार, राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता (IMD Rain Prediction) कायम आहे. आज मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी

हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या भागात हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागातही आयएमडीकडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या भागातही आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.

मुंबईतील तापमान कसं असेल?

राज्यात इतर ठिकाणी पावसाची शक्यता असली तरी मुंबईकरांना उन्हाच्या झळा बसणार आहे. किनारपट्टी भाग वगळता राज्यात इतर अनेक ठिकाणी आज पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत पुढील 24 तासांत आकाश निरभ्र आणि कोरडं वातावरण पाहायला मिळेल. मुंबई शहर आणि उपनगरात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34°C आणि 23°C च्या आसपास असेल. सोमवारी नाशिक येथे 17.1  °C हे सर्वात कमी किमान तापमान होते. तर सोलापुरात सर्वाधिक 42.2°C तापमानाची नोंद  झाली आहे.

वाढत्या उष्णतेपासून किंचित दिलासा

देशाच्या हवामानात बरेच बदल पाहायला मिळत आहेत. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता बळावली आहे. दिल्लीतही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आठवड्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओदिसामध्ये 9 एप्रिलपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 11 ते 17 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता कमी असेल. त्यानंतर तापमान वाढ होऊन सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

जूनमध्ये येणाऱ्या पावसाला विलंब होण्याची शक्यता, अती गारपीट किंवा पाऊस झाल्यास परिणाम काय?  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Drought Special Report : एक एक थेंब पाण्यासाठी वणवण, राज्यभरातील शेतकऱ्यांची भीषण अवस्थाABP Majha Headlines : 10 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAmey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Embed widget